कॅनबेरा : अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेली परिस्थिती ही ७०च्या दशकात आलेल्या दोन तेल संकटापेक्षा (ऑइल शॉक) अधिक गंभीर असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाचे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी केला आहे.
सध्याचे जग आखाती युद्ध आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली ऊर्जा टंचाई या दोहोंचा एकत्रित सामना करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जगाला ऊर्जा टंचाईचा सामना करावा लागेल. यातून कोणताही देश वाचू शकणार नाही, असा इशारा बिरोल यांनी दिला.
होर्मुझ सामुद्रधुनी बंद; पुरवठ्यावर मोठा परिणाम
होर्मुझ सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद झाल्याने आणि ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्यात दररोज सुमारे १.१ कोटी बॅरल्सची घट झाली आहे. ही घट १९७०च्या दशकातील दोन्ही तेल संकटांच्या एकत्रित परिणामापेक्षा दुप्पट असल्याचे बिरोल यांनी नमूद केले.
वर्क फ्रॉम होम वाढवण्याचे आवाहन
आयोगाने ऊर्जा वापर कमी करण्यासाठी सरकारांनी काही उपाययोजना कराव्यात, असे सुचवले आहे. यात घरून काम (वर्क फ्रॉम होम) वाढवणे, कार शेअरिंगला प्रोत्साहन देणे आणि महामार्गांवरील वेगमर्यादा कमी करणे यांचा समावेश आहे.
ट्रम्प यांच्यामुळे तेल दर कोसळले
तेल दर घसरणब्रेंट क्रूड १०२ -१०%डब्ल्यूटीआय क्रूड ९० -९%गॅसोलिन ३.१०४ -६%हिटींग ऑईल ४.३९० -५%इंडियन बास्केट १५० -५%नॅचरल गॅस २.९७९ -३.७५%मर्बन क्रूड १४५ -०.९८%
Web Summary : Current energy crisis, fueled by conflicts, surpasses 1970s oil shocks. Supply disruptions are double those earlier crises. IEA advises work-from-home, carpooling, and speed limit reductions. Oil prices have declined due to various factors.
Web Summary : वर्तमान ऊर्जा संकट, संघर्षों से प्रेरित, 1970 के दशक के तेल झटकों से भी अधिक गंभीर है। आपूर्ति व्यवधान पहले के संकटों से दोगुने हैं। आईईए ने वर्क-फ्रॉम-होम, कारपूलिंग और गति सीमा में कमी की सलाह दी है। विभिन्न कारकों से तेल की कीमतों में गिरावट आई है।