Join us  

अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC ने बनवला मेगा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 7:27 PM

NTPC's mega plan to compete with Ambani, Adani and Tata : 15 हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कंपनी तीन सहाय्यक कंपन्यांना लिस्ट करण्यात येणार आहे.  

नवी दिल्लीः नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (NTPC) मार्च 2024 पर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे 15 हजार कोटींचा निधी गोळा करण्याची योजना आखली आहे. यासाठी NTPC आपल्या तीन सहाय्यक कंपन्या NTPC रिन्यूएबल एनर्जी, NEEPCO (नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) आणि NTPC विद्युत व्यापारी निगम यांची शेअर बाजारात लिस्ट करणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. (NTPC's mega plan to compete with Ambani, Adani and Tata)

15 हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कंपनी तीन सहाय्यक कंपन्यांना लिस्ट करण्यात येणार आहे.  या व्यतिरिक्त NSPCL, (NTPC-SAIL Power Company Ltd) मधील आपला हिस्सा विकेल. या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. एनटीपीसी आणि सेल यांच्यात 50, 50 टक्के भागांसह हा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीची स्थापना 8 फेब्रुवारी 1999 रोजी झाली.

ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होणार लिस्टिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NTPC REL ची (एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी)  लिस्टिंग ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. एनटीपीसीचा त्यात 100% हिस्सा आहे. या कंपनीकडे सध्या 3450 मेगावॅटचा प्रकल्प आहे, त्यापैकी 820 मेगावॅटचे बांधकाम सुरू आहे. 2630 मेगावॅटच्या वीज खरेदी कराराबाबत काम सुरू आहे. नवीकरणीय ऊर्जा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली.

2032 पर्यंत 60GW रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्यएनटीपीसीने 2032 पर्यंत 60GW रिन्यूएबल एनर्जी निर्मितीचे लक्ष्य ठेवले. 2032 पर्यंत 130 GW वीजनिर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 45 टक्क्यांच्या जवळ असेल. यापूर्वी एनटीपीसीने 2032 पर्यंत 32 जीडब्ल्यूचे नूतनीकरणयोग्य ऊर्जा लक्ष्य ठेवले होते, जे एकूण उद्दिष्टाच्या 25 टक्के होते.

अदानी ग्रीन एनर्जीवर खर्च करतील 1.5 लाख कोटी खरं तर ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात देशातील मोठ्या कंपन्या झपाट्याने विस्तारत आहेत. अदानी यांनी अलीकडेच सांगितले की, ते पुढील 10 वर्षांत क्लीन एनर्जीसाठी 20 अब्ज डॉलर किंवा 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतील. मिंटच्या अहवालानुसार, अदानी समूह सध्या 4920 मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी निर्मिती करत आहे. याशिवाय 5124 मेगावॅट उत्पादन क्षमतेवर काम चालू आहे.

रिलायन्स ग्रीन एनर्जीची मेगा योजनारिलायन्स इंडस्ट्रीजने क्लीन एनर्जीसाठी रिलायन्स ग्रीनची स्थापना केली आणि या कंपनीसाठी 75 हजार कोटींचा मोठा निधी जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद 2021 मध्ये मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की, रिलायन्स 2030 पर्यंत अक्षय स्त्रोतांमधून 100 गिगावॅट  रिन्यूएबल एनर्जी निर्माण करेल.

टाटा पॉवर आयपीओ लाँच करणारटाटा समूहाची कंपनी टाटा पॉवर देखील क्लीन एनर्जीमध्ये वेगाने प्रगती करत आहे. टाटा पॉवर आपला हरित ऊर्जा व्यवसाय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा विचार करत आहे. याद्वारे ती 3500 कोटींपेक्षा जास्त निधी गोळा करेल.

टॅग्स :टाटामुकेश अंबानीअदानीव्यवसाय