Pension Fund for kids : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नॅशनल पेन्शन स्किम निवृत्तीसाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. मात्र, NPS आणि NPS वात्सल्य योजनेत काही बदल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही लोक NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्किमवर टीका करत आहेत तर काही लोक त्याचं कौतुक करत आहेत. यापैकी एक म्हणजे NPS वात्सल्य योजनेतील बदल. या योजनेंतर्गत, पालक आपल्या मुलांच्या पेन्शनसाठी किंवा त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खाते उघडू शकतात. तुमचे करिअर घडवण्यासाठी तुम्हाला पेन्शन फंडाच्या मुदतपूर्तीपूर्वी काही रक्कम काढायची असेल, तर आता ते करणे सोपे झाले आहे.
काही बदलांमुळे पेन्शनचा मार्ग सुकरएनपीएस वात्सल्य व्यतिरिक्त, इतर काही बदलांमुळे नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. यावर्षी NPS भारत पेमेंट सिस्टमशी जोडले गेले आहे. याद्वारे एनपीएसमध्ये योगदानासाठी कालमर्यादा वाढविण्याबाबत विचार केला जात आहे. आधार प्रमाणीकरणाद्वारे NPS ला एक नवीन सुरक्षा स्तर प्रदान करण्यात आला आहे. यामुळे एनपीएसचा सर्व डेटा सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीकडे राहील. ही तरतूद PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाने १ एप्रिल २०२४ पासून केली आहे. यानंतर NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी पासवर्डसह आधार प्रमाणीकरण अनिवार्य झाले आहे.
अटल पेन्शन योजनेचे नियमही बदललेअटल पेन्शन योजनेत खाती उघडण्याचे नियमही बदलण्यात आले आहेत. पूर्वी फक्त एक केंद्रीय रेकॉर्ड ठेवणारी एजन्सी होती. आता आणखी २ केंद्रीय रेकॉर्ड ठेवणाऱ्या एजन्सी याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. ईगॉव टेक्नॉलॉजी प्रा. लि. असं तिचं नाव होतं. ही कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि दुसरी केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड आहे.