Join us  

आता प्लॅटफॉर्मवरही ‘रेल्वे केटरिंग’चे पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 4:46 AM

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरही खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरही खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेरीवाल्यांकडून विकण्यात येणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता निकृष्ट असते. रेल्वे प्रवाशांना चांगले पदार्थ मिळावेत, यासाठी रेल्वे केटरिंग सेवेला प्लॅटफॉर्मवर पदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.रेल्वे स्टेशनवर गर्दीच्या ठिकाणी रेल्वे केटरिंगच्या मालकीचे स्टॉल आहेत. तथापि, त्यांना प्लॅटफार्मवर पदार्थ विकण्याची परवानगी नव्हती. प्लॅटफॉर्मवर पूर्णत: फेरीवाल्यांचेच राज्य असते. त्यांच्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नेहमीच तक्रारी असतात. ‘रेल्वे केटरिंग’मुळे प्रवाशांना आता प्लॅटफॉर्मवरही गुणवत्तापूर्ण पदार्थ मिळतील.रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विभागीय रेल्वे स्थानिक गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवर विक्री स्टॉल सुरू करण्याचे परवाने रेल्वे केटरिंगला देईल. यात फूड प्लाझा, उपाहारगृह आणि अन्य स्वरूपांच्या सेवांचा समावेशअसेल.सूत्रांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने २0१७ मध्ये नवे केटरिंग धोरण लागू केले आहे. त्यात रेल्वेत, तसेच प्लॅटफॉर्मवर गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.या धोरणानुसार, रेल्वेत पुरविण्यात येणाºया खाद्यपदार्थांबाबत नवीन निकष लावण्यात आले. त्यानुसार बदलही करण्यात आले.गुणवत्तेवर असेल नजरपदार्थांच्या गुणवत्तेवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे केटरिंग सेवेच्या स्वयंपाकघरांत उच्च घनतेचे (हाय डेफिनेशन) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेला जोडण्यात आले आहेत. स्वयंपाकघरात उंदीर, पाली आणि किडे असल्यास त्याची नोंद ही यंत्रणा तात्काळ घेते. तिकीट सिस्टीममधूनच मिळते. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरविण्यात आली आहे.

टॅग्स :अन्नभारतीय रेल्वे