Join us  

आता दोन हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी लागणार नाही ओटीपी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:17 PM

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी बँकांना ओटीपीशिवाय ट्रान्झॅक्शन करण्यास आरबीआयने मंजुरी दिली आहे

मुंबई - ऑनलाइन खरेदी-विक्रीवेळी पेमेंट करण्यासाठी ओटीपीची मागणी केली जाते. मात्र आता अनेक ई कॉमर्स कंपन्या आपल्या नियमित ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपीची आवश्यकता संपुष्टात आणण्याच्या विचारात आहेत. ऑनलाइन ट्रन्झॅक्शन अधिकाधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टने यापूर्वीच ही सुविधा देणे सुरू केले आहे. तर स्विगी आणि ऑनलाइन कॅब सुविधा देणाऱ्या कंपन्याही लवकरच याची अंमलबजावणी करणार आहेत.  भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रमवार पद्धतीने नियमांमध्ये सूट दिल्याने ओटीपीशिवाय ट्रान्झॅक्शन होणे शक्य झाले आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी बँकांना ओटीपीशिवाय ट्रान्झॅक्शन करण्यास आरबीआयने मंजुरी दिली होती. 

याबाबत पेटीएम पेमेंट गेटवेचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट पुनीत जैन यांनी सांगितले की, त्यांची कंपनी व्यापाऱ्यांना ओटीपीशिवाय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या दृष्टीने सक्षम बनवत आहोत. त्याबरोबरच इनोव्हेशन रेकरिंग पेमेंट्स सुविधा प्रदान करण्याचा आमचा विचार आहे. हे पेमेंट्स कार्ड आणि वॉलेट्सशिवाय यूपीआयच्या माध्यमातून करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रइंटरनेटपे-टीएमस्विगी