Join us  

पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:26 AM

कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल.

मुंबई : कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल. त्यासाठी बीएसएनएलने रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाशी करार केला आहे. ही माहिती रिलायन्सच्या ‘अनलिमिट’ ब्रॅण्डअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बीएसएनएलला दिली जाणार आहे.‘अनलिमिट’ अंतर्गत ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ (आयओटी) तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याचा वापर शेती, वाहतूक व्यवस्था व वैद्यकीय उपचारांमध्ये करता येतो. यासाठी कंपनीने बीएसएनएलशी करार केला आहे. यामुळे या मोबाइलधारकांना आयओटीआधारित विविध अ‍ॅप्सचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :मोबाइल