-उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउंटंट)|अर्जुन : कृष्णा, १ नोव्हेंबर २०२५ पासून जीएसटी नोंदणी फक्त तीन दिवसांत मिळणार असे ऐकतोय..कृष्ण : हो अर्जुना ! सरकारने जीएसटी नोंदणी प्रक्रियेत नवीन नियम 14A लागू केला आहे. विशेषतः लहान करदात्यांसाठी जे इतर नोंदणीकृत व्यक्तींना (B2B) वस्तू किंवा सेवा पुरवतात, त्यांना अर्ज केल्यानंतर तीन कामकाजाच्या दिवसांत नोंदणी मंजूर केली जाईल. जर त्यावेळेपर्यंत कार्यवाही झाली नाही, तर ती नोंदणी आपोआप मंजूर झाल्याचे समजले जाईल !अर्जुन : कृष्णा, कोणकोण नियम 14A अंतर्गत अर्ज करू शकतात?कृष्ण : हा नियम त्या करदात्यांसाठी आहे ज्यांचे व्यवहार B2B आहेत आणि ज्यांची एकूण करदेयता ₹२.५ लाख प्रति महिना यापेक्षा जास्त नाही. लहान आणि मध्यम स्तरावरील पुरवठादारांसाठी ही सोय आहे, ज्यांना नोंदणीसाठी दीर्घ प्रतीक्षा टाळायची आहे.अर्जुन : FORM GST REG-01 मध्ये काहीनवीन बदल आहेत का?कृष्ण : हो. या फॉर्ममध्ये नवीन प्रश्न जोडला आहे. 'Rule 14A अंतर्गत नोंदणीसाठी पर्याय निवडायचा आहे का? -YES/NO'. जर अर्जदाराने YES पर्याय निवडला, तर त्याचा अर्ज जलद प्रक्रियेनुसार हाताळला जाईल.अर्जुन : या नियमाखाली नोंदणी मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?कृष्ण : १. नोंदणी करताना मुख्य जबाबदार व्यक्ती आणि एका भागीदाराची आधार पडताळणी करावी लागते. त्यामुळे अर्ज खरा आहे का हे समजते.२. अर्ज सादर केल्यावर काही चुका नसतील, तर तीन दिवसांत जीएसटी नोंदणी मंजूर होते. अधिकऱ्याने वेळेत कार्यवाही न केल्यास, नोंदणी आपोआप मंजूर झाली असे गृहीत धरले जाते.३. एका PAN साठी एका राज्यात किंवाकेंद्रशासित प्रदेशात फक्त एकच नोंदणी या नियमाखाली मिळू शकते.
Web Summary : New Rule 14A speeds up GST registration for small B2B taxpayers with liabilities under ₹2.5 lakh monthly. Selecting 'YES' in FORM GST REG-01 ensures faster processing, provided Aadhar authentication is completed and the application is error-free. Only one registration per PAN is allowed.
Web Summary : नियम 14A के तहत, छोटे B2B करदाताओं के लिए जीएसटी पंजीकरण प्रक्रिया तेज हुई, जिनकी कर देनदारी ₹2.5 लाख प्रति माह से कम है। FORM GST REG-01 में 'हाँ' चुनने पर तेजी से प्रक्रिया होगी, बशर्ते आधार प्रमाणीकरण पूरा हो और आवेदन त्रुटि रहित हो। प्रति पैन केवल एक पंजीकरण की अनुमति है।