Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता नफ्यातील कंपन्यांचा हिस्सा सरकार विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:01 IST

नफ्यात असलेल्या सरकारी कंपन्यांतील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

नवी दिल्ली : नफ्यात असलेल्या सरकारी कंपन्यांतील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकारमधील सचिवांच्या समितीने सोमवारी भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड, कन्टेनर कॉपोर्रेशन आॅफ इंडिया व शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियातील हिस्सा विकण्यास मंजुरी दिली आहे.याखेरीज दोन वीज कंपन्याही विकण्यास संमती देण्यात आली असून, एनटीपीसी ही सरकारी कंपनीच कदाचित त्या विकत घेईल, असे सांगण्यात रेत आहे. एअर इंडियाच्या बाबतीतही विकण्याचा निर्णय घेतला असला तरी ही विमान कंपनी विकण्याचे वा त्यातील हिस्सा विकण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सफल झालेले नाहीत.

टॅग्स :केंद्र सरकार