Join us

आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:28 IST

Old Car Fitness Test Fees: सरकार जुन्या वाहनांच्या मालकांच्या खिशातून अधिक पैसे काढण्याची योजना आखत आहे. जर तुमच्याकडे २० वर्षांपेक्षा जुनी कार असेल तर येत्या काळात अधिक पैस मोजावे लागू शकतात.

Old Car Fitness Test Fees: सरकार जुन्या वाहनांच्या मालकांच्या खिशातून अधिक पैसे काढण्याची योजना आखत आहे. जर तुमच्याकडे २० वर्षांपेक्षा जुनी कार असेल, तर तुम्हाला तिची फिटनेस चाचणी करण्यासाठी २,६०० रुपये खर्च करावे लागू शकतात. त्याच वेळी, १५ वर्षांपेक्षा जुन्या ट्रक आणि बसच्या मालकांना यासाठी २५,००० रुपये द्यावे लागू शकतात.

प्रत्यक्षात, रस्ते वाहतूक मंत्रालयाने फिटनेस चाचणीच्या शुल्कात मोठी वाढ प्रस्तावित केली आहे. आतापर्यंत खाजगी वाहनांसाठी इतका खर्च नव्हता, परंतु जेव्हा नवीन नियम लागू होतील तेव्हा प्रत्येक जुन्या वाहनासाठी फिटनेस चाचणी करणं अनिवार्य होईल आणि त्याची किंमत अनेक पटींनी वाढेल. याचा थेट परिणाम सामान्य वाहन मालकांच्या खिशावर होईल.

सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट

का वाढेल खर्च?

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, आतापर्यंत खाजगी वाहनांच्या फिटनेस चाचणीचे नियम इतके कडक नव्हते. नोंदणीची १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आरटीओ फक्त वाहन पाहून फिटनेस प्रमाणपत्र देत असे. परंतु आता असं प्रस्तावित आहे की १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक खाजगी वाहनाला वास्तविक तांत्रिक फिटनेस चाचणी द्यावी लागेल. वाहनाची खरी स्थिती समजून घेण्यासाठी ही चाचणी ऑटोमेटेड मशीनवर केली जाईल.

जुन्या वाहनांमुळे अधिक प्रदूषण होतं आणि कधीकधी रस्ते अपघात होतात. मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, जेव्हा चाचणी शुल्क इतके वाढेल तेव्हा लोक जुन्या वाहनांऐवजी नवीन वाहने खरेदी करण्याकडे वळतील.

ट्रक आणि बस मालकांना सर्वाधिक फटका

खासगी वाहनांपेक्षा व्यावसायिक वाहनांवर होणारा परिणाम जास्त असेल. या प्रस्तावानुसार, १०, १३, १५ आणि २० वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले जाईल. आतापर्यंत १५ आणि २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचे फिटनेस शुल्क समान होतं, परंतु आता २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचं शुल्क दुप्पट करण्यात येणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि करांचा फटका व्यावसायिक वाहन मालकांना आधीच सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत फिटनेस टेस्टचा इतका जास्त खर्च त्यांच्यासाठी भारी पडू शकतो. विशेषत: ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे अशा लहान ट्रक आणि बस मालकांना याची अधिक झळ बसेल.

आतापर्यंतचे नियम काय?

व्यावसायिक वाहनं: त्यानंतर दर वर्षी आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस टेस्ट केली जाते.

खाजगी वाहनं: १५ वर्षांनंतर आणि नंतर दर पाच वर्षांनी नोंदणीच्या नूतनीकरणाच्या वेळी फिटनेस चाचणी.

टॅग्स :कारसरकार