Join us

आता क्रेडिट कार्ड बिझनेसमधील हिस्सा विकणार 'ही' दिग्गज सरकारी बँक, शेअर्सनं दिलाय १७००% नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:49 IST

सध्या या व्यवसायाचा १०० टक्के हिस्सा याच बँकेकडे आहे.

Multibagger Share BOB : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानं आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसायाची शाखा बीओबी फायनॅन्शिअल सोल्युशन्स लिमिटेडमधील ४९ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे. सध्या १०० टक्के हिस्सा हा बँक ऑफ बडोदाकडे आहे. 

बँक ऑफ बडोदानं एका स्ट्रॅटेजिक गुंतवणूकदाराला सोबत घेण्याच्या उद्देशानं ही योजना आखली आहे. ही प्रक्रिया वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यत असल्याची प्रतिक्रिया बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. बीओबी फायनॅन्शिअल सर्व्हिसेसमध्ये अधिक मूल्य जोडून त्याची अधिकाधिक वाढ करण्याचा विचार असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासाठी बँक एक किंवा अधिक गुंतवणूकदारांना ४९ टक्के हिस्सा विकणार आहे.

काय आहे शेअर्सची स्थिती?बँक ऑफ बडोदाचे शेअर्स शुक्रवारी १९०.१० रुपयांवर बंद झाले होते. या वर्षी YTD मध्ये यात २.०७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरनं ९३.०९ टक्के आणि गेल्या पाच वर्षांत यात ६४.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअरनं सर्वाधिक १७८४.०४ रिटर्न दिलाय. यादरम्यान या शेअरची किंमत १० रुपयांवरून वाढून १९०.१० रुपयांवर आली आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बँकव्यवसाय