Join us

नव्या बदलांसह लवकरच येणार 10 रुपयांची नोट, आरबीआयनं सुरू केली प्रिंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:20 IST

नवी दिल्ली- देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता 10 रुपयांच्या नोटांमध्येही लवकरच बदल करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यावर आता 10 रुपयांच्या नोटांमध्येही लवकरच बदल करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या 10 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये बदल करून बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या नोटा चॉकलेट ब्राऊन कलरच्या असतील आणि या नोटांवर कोणार्क सूर्य मंदिराचा फोटो छापण्यात येणार आहे.तसेच या नोटांवर छपाईचं वर्षं 2017 लिहिलं असेल. नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआयनं 10 रुपयांच्या या नव्या नोटांचे जवळपास 1 बिलियन पीस तयार केले आहेत. गेल्या आठवड्यात सरकारनं या नोटांच्या बदललेल्या संरचनेला परवानगी दिली आहे.2005मध्येही 10 रुपयांच्या नोटांमध्ये बदल करण्यात आला होता. यापूर्वी ऑगस्ट 2017मध्ये महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या 50 आणि 200 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर 2016मध्ये सरकारनं 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद केल्या. त्याऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. आता इतरही नोटांच्या रंगसंगतीत भारतीय रिझर्व्ह बँक बदल करण्याच्या तयारीत आहे. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली होती. मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहणार आहेत. ही नोट महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्य अधिसूचनेत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून लवकरच नव्या बँक नोटा जारी करण्यात येणार आहेत. या नोटा महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेटलेटरमध्ये आर हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल. त्याबरोबरच आरबीआय 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे. मात्र त्यांच्याही जुन्या नोटा चलनात कायम राहतील.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक