Join us

एलपीजी गॅस धारकांना मोठं गिफ्ट, विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:37 IST

नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर 120.50 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे, तर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची घट केली आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.

दर कमी केल्याने 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 500.90 रुपयांऐवजी आता 494.99 रुपयांना मिळणार आहे. तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात केल्यानं आता 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना मिळणार आहे.  हे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. भारतातील सर्वात मोठी तेल पुरवठादार कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं ही माहिती दिली आहे. एलपीजी सिलिंडरचे या महिन्यात दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. 1 डिसेंबर रोजी अनुदानित सिलिंडरचे दर 6.50 रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे उद्यापासून नव्या दरानुसार ग्राहकांना सिलिंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. 

टॅग्स :गॅस सिलेंडर