Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकियाच्या ७४ हजार कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के घरचा रस्ता धरणार? 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:43 IST

Nokia Layoffs : देशात अनेक ठिकाणी गॅस टंचाईमुळे कारखाने बंद करावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता टेक कंपनीने २० टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Nokia Layoffs : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतात एलपीजी गॅस आणि इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गॅस तुटवड्याने अनेक कारखाने बंद झाले आहे. अशा परिस्थितीत आणखी एक नोकरकपातीचा धक्का भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. जागतिक दूरसंचार क्षेत्रातील नामांकित कंपनी 'नोकिया' आपल्या ७४,१०० कर्मचाऱ्यांच्या जागतिक वर्कफोर्समध्ये तब्बल २० टक्क्यांनी कपात करण्याच्या तयारीत आहे. या मोठ्या पुनर्रचनेचा फटका नोकिया इंडियालाही बसण्याची शक्यता असून, भारतातही सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. 'एआय' आधारित वाढती मागणी आणि ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे समजते.

नेतृत्व बदल आणि नवीन रचनाकंपनीने १ एप्रिल २०२६ पासून प्रभावी होणारे महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. समर मित्तल यांची 'इंडिया कंट्री बिझनेस लीडर' पदी, तर विभा मेहरा यांची 'इंडिया कंट्री मॅनेजर' पदी बढती करण्यात आली आहे. तरुण छाबडा यांनी इंडिया कंट्री हेडची भूमिका सोडली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये सीईओ जस्टिन हॉटार्ड यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार, कंपनी आता 'नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर' आणि 'मोबाइल इन्फ्रास्ट्रक्चर' या दोन मुख्य भागांत विभागली जाईल.

कपातीमागील मुख्य कारणेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे अपेक्षित निकाल मिळाले नाहीत, त्यामुळे कंपनी पुन्हा जुन्या 'हॉरिजोंटल' संरचनेकडे परतत आहे. क्लाउड अँड नेटवर्क सर्व्हिसेस आणि मोबाईल नेटवर्क्स यांचे विलीनीकरण केले जात आहे. यामुळे अनेक विभागांमधील कामाचे स्वरूप सारखेच झाल्याने अतिरिक्त पदे रद्द केली जातील. जे विभाग कंपनीच्या मुख्य प्राधान्यक्रमात नाहीत, त्यातील कर्मचाऱ्यांवर जगभरात आणि भारतातही कपातीचा परिणाम होईल.

नोकियामधील कर्मचाऱ्यांची आकडेवारी२०१८ मध्ये नोकियाकडे १,०३,००० कर्मचारी होते, जे २०२५ च्या अखेरीस घटून ७४,१०० वर आले आहेत. भारतात २०२३ मध्ये १८,२०० कर्मचारी होते, जे २०२५ मध्ये १७,७०८ झाले. मात्र, आताच्या २०% कपातीमुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात खाली येण्याची भीती आहे. यापूर्वी जर्मनी (७००), फ्रान्स (४२७), ग्रीस आणि इटली (३००) मध्येही नोकऱ्या कपात करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.

वाचा - ट्रम्प यांचा 'ब्रेक' पण इराण आपल्या अटींवर ठाम! बाजारात पुन्हा मंदीचे सावट; गुंतवणूकदारांनी काय करावं?

कंपनीची अधिकृत भूमिकानोकिया इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "भारतातील आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी कंपनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेईल. हे बदल जागतिक धोरणाचा भाग आहेत." मात्र, प्रत्यक्ष कर्मचारी कपातीबाबत कंपनीने कोणतीही स्पष्ट टिपणी करणे टाळले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nokia layoffs: 20% of workforce may face job cuts.

Web Summary : Nokia may cut 20% of its global workforce, impacting India. Restructuring aims to streamline operations amid rising AI demand. Leadership changes also announced.
टॅग्स :नोकियाकर्मचारी कपाततंत्रज्ञाननोकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्स