Join us

२ जी घोटाळ्यात सीबीआयच्या अपिलावर लगेच सुनावणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:00 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला; सुनावणी आॅक्टोबरमध्येच

नवी दिल्ली : २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या सुटकेविरुद्ध सीबाआयने दाखल केलेल्या अपिलावर तातडीची सुनावणी घेण्यास दिल्लीउच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ए. राजा यांच्यासह सर्व आरोपींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेची २४ आॅक्टोबरला नियोजित असलेली सुनावणी त्याआधीच घेण्याची विनंती करणारी याचिका सीबीआयने उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्या. ए. के. चावला यांनी म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी आधी ठरलेल्या तारखेलाच होईल. सर्व पक्ष यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, द्विपक्षीय गुंतवणूक करारांनुसार देशाला मोठी भरपाई द्यावी लागण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे लवादाचे निर्णय उंबरठ्यावर आले आहेत. त्यामुळे तातडीची सुनावणी होणे आवश्यक आहे. सीबीआयच्या अर्जाला आरोपींच्या वकिलांनी विरोध केला. सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या खटल्यांत विशेष न्यायालयाने २१ डिसेंबर २0१७ रोजी ए. राजा यांच्यासह डीएमके खासदार कनिमोझी आणि इतर आरोपींना दोषमुक्त केले होते.ईडी, सीबीआयने दाखल केलेले खटलेच्ईडीने दाखल केलेल्या खटल्यातून १७ आरोपी दोषमुक्त झाले असून, डीएमकेचे प्रमुख दिवंगत एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मल, विनोद गोयंका, आसिफ बलवा, चित्रपट निर्माता करीम मोराणी, पी. अमृतम आणि कलाईगनार टीव्हीचे संचालक शरद कुमार यांचा त्यात समावेश आहे.च्त्याच दिवशी सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यातून न्यायालयाने माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजा यांचे स्वीय सचिव आर. के. चंडोलिया, युनिटेकचे एमडी संजय चंद्र आणि रिलायन्सचे अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (आरएडीएजी) तीन वरिष्ठ अधिकारी गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर यांना आरोपातून मुक्त केले.

टॅग्स :2 जी स्पेक्ट्रम घोटाळाउच्च न्यायालयदिल्ली