Join us

अनंत अंबानींबद्दल बोलताना भावूक झाल्या नीता अंबानी; राधिकासोबतच्या जोडीबाबत म्हणाल्या 'मॅजिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:09 IST

Neeta Ambani On Aakash Ambani: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी नुकत्याच हार्वर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीबद्दल बोलताना खूप भावूक झाल्या.

Neeta Ambani On Aakash Ambani: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी नुकत्याच हार्वर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीबद्दल बोलताना खूप भावूक झाल्या. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी आपलं क्रिकेटप्रेम आणि अनंत-राधिकाच्या जोडीबद्दलही सांगितलं.

हार्वर्ड विद्यापीठाच्या 'हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स'मध्ये नीता अंबानी बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या तब्येतीबद्दल आणि आपल्या मुलानं या आव्हानांवर कशी मात केली याबद्दल सांगितलं. इतकंच नाही तर गेल्या वर्षी जेव्हा त्यांनी राधिका मर्चंट यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा हा क्षण त्याच्यासाठी जादूपेक्षा कमी नव्हता, असंही म्हटलं.

'अनंत अत्यंत आध्यात्मिक'

अनंत अंबानी स्वभावाने खूप धार्मिक आहे. त्याचबरोबर अध्यात्माशीही त्यांचा सखोल संबंध आहे. आयुष्यभर लठ्ठपणाशी झगडत राहिला असला तरी तो नेहमीच सकारात्मकतेनं पुढे गेला आहे. अशा तऱ्हेने तो त्याची जीवनसाथी राधिकाशी भेट झाली, त्यांना एकत्र पाहावं, ते एखाद्या जादूप्रमाणे असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट गेल्या वर्षी जुलैमध्ये विवाहबंधनात अडकले. अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची मीडियात बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या लग्नाला जगभरातील अनेक उद्योगपती, राजकारणी आणि सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती. पॉप स्टार रिहाना आणि जस्टिन बीबर यांनीही त्यांच्या लग्नसमारंभात परफॉर्म केलं.

"मला क्रिकेटची आवड"

नीता अंबानी यांनी या कार्यक्रमात क्रिकेटशी असलेल्या नात्याबद्दलही भाष्य केले. "मला क्रिकेट आवडतं. वयाच्या ४४ व्या वर्षी माझ्या आयुष्यात क्रिकेट आलं, याच वयात बहुतेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर निवृत्त होतात. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी 'मुंबई इंडियन्स' विकत घेतली. या संघात त्या वेळचे सर्व मोठे क्रिकेट स्टार्स होते. माझं काम होतं त्यांच्यासोबत बसून संघाला मोटिव्हेट करणं, माझ्या एका बाजूला सचिन तेंडुलकर आणि दुसऱ्या बाजूला झहीर खान. त्यावेळी मी तो सामना पाहत होते. मग मी त्याला विचारलं की एक गोलंदाज एवढी लांब धाव का घेत आहे आणि एक एवढी कमी धाव का घेत आहे? तेव्हा सचिननं एक वेगवान गोलंदाज आहे आणि दुसरा फिरकी गोलंदाज असल्याचं सांगितलं. त्यावेळी मला हे सगळे प्रश्न विचारावेसे वाटले, पण आज मला स्वत:चे कौतुक करावेसं वाटतं. आज मला माहित आहे की लेग स्पिन म्हणजे काय, ऑफ स्पिन काय, गुगली म्हणजे काय. गोलंदाज कुठे चेंडू मारणार आहे आणि फलंदाज त्या चेंडूचे काय करणार आहे हे मी सांगू शकते, असंही नीता अंबानींनी म्हटलं.

टॅग्स :नीता अंबानीअनंत अंबानी