Join us

अमेरिकेत अंड्याला सोन्याचा भाव! एका अंड्याच्या किमतीत भारतात डझनभर येतील; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:28 IST

US Egg Price Hike: अमेरिकेत अंड्याच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. तेथील एका अंड्याच्या किमतीत भारतात एक डझन अंडी येतील.

US Egg Price Hike: भारतात सध्या उन्हाळा सुरू असल्याने अंड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. साधारणपणे आपल्याकडे थंडीच्या दिवसात अंड्यांना मागणी वाढते. पण, अमेरिकेत उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत अंड्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तेथील एका अंड्याच्या किमतीत भारतात १ डझन अंडी येऊ शकतात. या संधीचा फायदा घेत न्यूयॉर्कस्थित स्किनकेअर ब्रँडने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अंड्यांवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. ग्राहकही अर्ध्या किमतीत अंडी मिळत असल्याने गर्दी करत आहेत. सोशल मीडियावरही याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसध्या अमेरिकेत एक डझन अंड्याची किंमत १० डॉलर (८६७.४२ रुपये) ला आहे. द ऑर्डिनरी ब्रँडच्या न्यूयॉर्क स्टोअरमध्ये ३.३७ डॉलरमध्ये याची विक्री केली जात आहे. या अंड्याची ऑफर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एनबीसी न्यूज चॅनल आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत अंड्याच्या किमती वाढत आहेत. जानेवारीमध्ये अड्यांच्या किमतीत ४ डॉलरची वाढ झाली होती. हीच किंमत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंमत १८ डॉलरवर पोहोचली. मार्च २०२५ मध्ये, अंड्याचे दर प्रति डझन सरासरी ८ डॉलरपेक्षा जास्त होते.

द ऑर्डिनरीने इंस्टाग्रामवर विकल्या जात असलेल्या अंड्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "आम्ही ऐकले की न्यूयॉर्कला अंड्यांची गरज आहे. या शनिवार व रविवार तुम्ही आमच्या स्टोअरमध्ये येऊन ३.३७ डॉलरमध्ये डझनभर अंडी खरेदी करू शकता. यात कुठलीही फसवणूक नाही, जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत अंडी विकली जात आहेत. द ऑर्डिनरीच्या या पोस्टला ९४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर लोकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

अंड्यांच्या किमती का वाढत आहेत?यूएस डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर (USDA) नुसार, अमेरिकेत बर्ड फ्लू H5N1 किंवा एव्हियन इन्फ्लूएंझा महामारीमुळे २०२२ पासून १५ कोटीहून अधिक पक्षांना मारण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यातच १.९ कोटी कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. अमेरिका आता तुर्की आणि दक्षिण कोरियाकडून अंडी खरेदी करत आहे. नॅशनल चेंबर ऑफ पोल्ट्री अँड फीड प्रोड्युसर्सच्या संचालिका कॅटरझिना गावरोन्स्का यांनी सांगितले की, आता पोलंडमधूनही अंडी खरेदी करण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :अमेरिकाअमेरिकामहागाई