-पवन देशपांडे(सहाय्यक संपादक)
आतून तांब्याची तार असलेल्या वायरी आपल्या संपूर्ण घरात असतातच, शिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम असते असं म्हणतात. पण आता हे तांबे नवे सोने बनू लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सोने, चांदी. पण २०२५ फारसा गाजावाजा न करता तांब्याने (कॉपर) दमदार कामगिरी केली आहे.
तांबे आता केवळ औद्योगिक कच्चा माल न राहता, एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून समोर येतो आहे. याकडे आता दुर्लक्ष करणं ही चूक ठरू शकते. जी चूक अनेकांनी चांदीच्या बाबतीत केली आणि नंतर पश्चात्ताप झाला, तसाच प्रश्न तांब्याबद्दलही होऊ शकतो. २०२५ मध्ये तांब्यातील गुंतवणुकीने सुमारे ५०-६० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
तांब्याची मागणी; तीन मोठे आधार- इन्फ्रास्ट्रक्चर: रस्ते, पूल, रेल्वे, घरबांधणी अशा ठिकाणी कॉपरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.- ऊर्जा संक्रमण: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, वीज ग्रीड, बॅटरी स्टोरेज या सगळ्याचा कणा म्हणजे कॉपर वायरिंग. येथे कॉपरचा वापर वाढला आहे.- इलेक्ट्रिक वाहने: एक इलेक्ट्रिक कार ही पारंपरिक पेट्रोल कारपेक्षा २ ते ३ पट अधिक कॉपर वापरते.
भारतातील तांब्याशी संबंधित टॉप शेअर्सकंपनीचे नाव ५ वर्षांचा परतावाप्रिसिजन वायर्स इंडिया ९३७.६२%हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ७४६.३८%भग्यनगर इंडिया ३७६.३७%वेदांता लिमिटेड २८६.०९%हिंदाल्को इंडस्ट्रीज २६८.९५%
संधी ओळखणार की पुन्हा मागे वळणार?तांब्याची खाणी आता खटू लागल्या आहेत. त्यातील उत्पादन कमी-कमी होत आहे. २०४० पर्यंत मागणी आणि पुरवठा यातील फरक ३० टक्क्यांवर जाणार आहे. गुंतवणूकदार म्हणून याचा फायदा घ्यायचा असेल तर तांब्यावर नजर ठेवावी लागेल. गेल्या दहा वर्षांत चांदीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आज पश्चात्ताप होतोय, तसाच प्रश्न आता तांब्याबाबत उभा आहे. संधी ओळखणार की पुन्हा मागे वळून पाहणार? यावर विचार करायलाच हवा...
तांब्याची खाणी आता खटू लागल्या आहेत. त्यातील उत्पादन कमी-कमी होत आहे. २०४० पर्यंत मागणी आणि पुरवठा यातील फरक ३० टक्क्यांवर जाणार आहे. गुंतवणूकदार म्हणून याचा फायदा घ्यायचा असेल तर तांब्यावर नजर ठेवावी लागेल. गेल्या दहा वर्षांत चांदीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आज पश्चात्ताप होतोय, तसाच प्रश्न आता तांब्याबाबत उभा आहे. संधी ओळखणार की पुन्हा मागे वळून पाहणार? यावर विचार करायलाच हवा...
गेल्या वर्षभरात कुणी किती दिला परतावा?
चांदी: 200%+
सोने: 85%+
तांबे: 60%+
जोखीमही समजून घ्याकॉपरमध्ये गुंतवणूक करताना डोळे उघडे ठेवायला हवेत. जागतिक मंदी आली तर किमती झपाट्याने घसरू शकतात. व्याजदर वाढ झाल्यावर दुरुस्ती येण्याचा धोका असतो. डॉलर मजबूत झाला तर कमॉडिटी किमतींवर दबाव येतो. म्हणूनच कॉपर ही पूर्ण पोर्टफोलिओची जागा घेणारी गुंतवणूक नाही, तर पूरक भूमिका बजावणारी आहे. त्यामुळे सरसकट गुंतवणूक यामध्ये करू नये, अन्यथा फटका बसण्याची शक्यता असते.
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक नेमकी कशी करावी?
सध्या थेट कॉपर ईटीएफ किंवा कॉपर नाणी उपलब्ध नाहीत. तरीही पर्याय आहेत:
एमसीएक्सवर कॉपर फ्युचर्स: मात्र उच्च जोखीम, अनुभव असलेल्यांसाठी.
कॉपर-आधारित शेअर्स: कॉपरच्या किमती वाढल्या की अशा शेअर्सना फायदा होतो.
परदेशी ईटीएफ: एलआरएसमार्गे जागतिक कॉपर ईटीएफ किंवा मोठ्या खाण कंपन्यांमध्ये गुंतवणूक.
'डॉ. कॉपर' का म्हणतात? कॉपरची मागणी वाढते तेव्हा अर्थव्यवस्था वाढते, आणि मागणी घटते तेव्हा मंदीची चाहूल लागते. यामुळेच कॉपरकडे विकसित अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर म्हणून पाहिलं जातं.
पुरवठा बाजूची खरी अडचणकॉपरच्या किमती वाढण्यामागे केवळ मागणी नाही, तर पुरवठ्यातील मर्यादा हेही मोठं कारण आहे. नवीन कॉपर खाण सुरू व्हायला १०-१५ वर्षे लागतात. खाणीतून निघणाऱ्या धातूचा दर्जा सतत घटतो आहे.पर्यावरणीय नियम, स्थानिक विरोध, भू-राजकीय तणाव यामुळे उत्पादनावर मर्यादा याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यामुळे मागणी वेगाने वाढतेय. पुरवठा तितक्याच वेगाने वाढत नाही. ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास कॉपरच्या किमती आणखी वाढणार.
Web Summary : Copper offers strong returns, driven by infrastructure, energy transition, and electric vehicles. Supply constraints may further boost prices. Consider copper-based shares or foreign ETFs, but understand the risks involved.
Web Summary : बुनियादी ढांचे, ऊर्जा परिवर्तन और इलेक्ट्रिक वाहनों से तांबे की मांग बढ़ रही है। आपूर्ति की कमी से कीमतें और बढ़ सकती हैं। तांबे के शेयर या विदेशी ईटीएफ पर विचार करें, लेकिन जोखिमों को समझें।