लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता असूनही भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडावर आपला विश्वास कायम ठेवला आहे. मार्च महिन्यात इक्विटी (शेअर आधारित) म्युच्युअल फंड योजनांमधील निव्वळ गुंतवणूक ५६ टक्क्यांनी वाढून ४०,४५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जुलै २०२५ नंतरचा हा एका महिन्यातील सर्वांत मोठा गुंतवणुकीचा आकडा ठरला आहे.
एसआयापीचा नवा उच्चांक
शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या ‘एसआयपी’ द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली. फेब्रुवारीत २९,८४५ कोटी रुपये असलेली एसआयपी गुंतवणूक मार्चमध्ये ३२,०८७ कोटींवर गेली आहे. मार्चमध्ये गोल्ड ईटीएफ गुंतवणूक कमी झाली आहे.
फ्लेक्सी, मिड कॅपला पसंती
- गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने फ्लेक्सी कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये सर्वाधिक रस दाखवला आहे.
- ‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या फ्लेक्सी कॅप फंडात १०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे.
- दुसरीकडे, करबचतीसाठी असलेल्या ‘ईएलएसएस’ योजनांमधून मात्र गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात पैसे काढल्याचे दिसून आले.
English
हिंदी सारांश
Web Title : Mutual Fund Boom: Equity Investments Surge by 56 Percent!
Web Summary : Despite market volatility, Indian investors' faith in mutual funds remains strong. Equity mutual fund investments surged 56% in March, reaching ₹40,450 crore, a peak since July 2023. SIP investments also hit a new high, with flexi-cap funds being the most preferred.

Web Title : म्यूचुअल फंड धमाका: इक्विटी निवेश में 56 प्रतिशत की बड़ी उछाल!
Web Summary : बाजार की अस्थिरता के बावजूद, भारतीय निवेशकों का म्यूचुअल फंड पर विश्वास कायम है। मार्च में इक्विटी म्यूचुअल फंड निवेश 56% बढ़कर ₹40,450 करोड़ हो गया, जो जुलाई 2023 के बाद सबसे अधिक है। एसआईपी निवेश भी नए शिखर पर, फ्लेक्सी-कैप फंड पसंदीदा।