Join us

मुंबई महानगर बनणार जगातील आघाडीची शहरी अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 07:59 IST

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) वर्ष २०४७ पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) वर्ष २०४७ पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) म्हटले आहे. 

या प्रदेशाचे सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) १.२ ते १.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे १२४ ते १५५ लाख कोटी रुपये) इतके होईल, तर लोकसंख्या ३.६ ते ३.८ कोटी इतकी अपेक्षित आहे, असे एमएमआरडीएने नमूद केले आहे. ‘एमएमआर’मध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड हे जिल्हे येतात. त्याचे एकूण क्षेत्रफळ ६,३२८ चौ.कि.मी आहे. 

४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर सुरू आहे काम  

३३७ किमी मेट्रो रेल्वे : १.३६ लाख कोटी

२०,००० कोटी नवी मुंबई विमानतळ

६३,५०० कोटी वर्सोवा-विरार सागरी मार्ग

४३,६०० कोटी वाढवण बंदर

५५,००० कोटी अलिबाग-विरार कॉरिडॉर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai poised to become a leading global urban economy.

Web Summary : Mumbai Metropolitan Region (MMR) is projected to be a leading global urban economy by 2047. Its GDP is expected to reach $1.2-1.5 trillion, with a population of 36-38 million. Several projects worth ₹4 lakh crore are underway, including metro lines, airports, and sea links to achieve this.
टॅग्स :मुंबईअर्थव्यवस्था