Join us  

मुकेश अंबानींची Reliance जोमात; सौदीचा तगडा गुंतवणूकदार मिळाला

By हेमंत बावकर | Published: November 05, 2020 6:12 PM

PIF investment in reliance retail: रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. परदेशातून रिलायन्सला मोठी गुंतवणूक मिळू लागली आहे.

रिलायन्स रिटेलला आणखी एक मोठा गुंतवणूकदार मिळाला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने सांगितले की, पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड कंपनीत 9555 कोटी म्हणजेच 1.3 अब्ज डॉलर गुंतविणार आहे. या बदल्यात पीआयएफला रिलायन्समध्ये 2.04 टक्के हिस्सा मिळणार आहे .

पीआयएफने रिलायन्स रिटेलची किंमत 4.587 कोटी गृहीत धरली आहे. पीआयएफने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये देखील 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाची ही पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (PIF) आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी (ADIA) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एकून 51 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यावर सहमती दर्शविली होती. ही डील 1 अब्ज डॉलरची झाली होती. यानुसार या दोन कंपन्या डिजिटल फायबर इन्फ्रास्ट्रक्टर ट्रस्टमध्ये 51 टक्के हिस्सेदारी मिळविणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या 3,799 कोटी रुपये गुंतविणार आहेत. 

करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका

 

गेल्या काही महिन्यांपासून धूमइक्विटी फर्म GENERAL ATLANTIC ने रिलायन्समध्ये 0.84 हिस्सा 3,675 कोटींना विकत घेण्याचे ठरविले आहे.  महत्वाचे म्हणजे जनरल अटलांटिकची रिलायन्समधील ही दुसरी गुंतवणूक आहे. या कंपनीने रिलायन्स जिओमध्ये 6,598.38 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. रिलायन्स रिटेलमध्ये झालेली ही तिसरी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जगातील दिग्गज टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेकने 7500 कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली होती. या बदल्यात कंपनीला रिलायन्स रिटेलची 1.75 टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. तसेच केकेआरने 1.75 टक्के हिस्सेदारी खरेदी करत 5550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्सचे देशभरात 12000 स्टोअर्स आहेत. 

धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1

रिलायन्सचा विस्तार रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने  फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे. हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL  ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीसौदी अरेबिया