Join us  

Fashion Industry मध्ये Reliance चं आणखी एक पाऊल; Ritu Kumar यांच्या कंपनीत खरेदी केला ५२ टक्के हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:39 PM

यापूर्वी Reliance नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतही केली होती मोठी गुंतवणूक. त्यानंतर आता Reliance Retail Ventures ने फॅशन डिझाइनर रितू कुमार (Ritu Kumar) यांच्या कंपनीत केली गुंतवणूक.

ठळक मुद्देयापूर्वी Reliance नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतही केली होती मोठी गुंतवणूक.आता Reliance Retail Ventures ने फॅशन डिझाइनर रितू कुमार यांच्या कंपनीत केली गुंतवणूक.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिटेल क्षेत्रात आता आपला दबदबा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने (Reliance Retail Ventures)  फॅशन डिझायनर रितु कुमार (Ritu Kumar) यांची कंपनी रितिका प्रा. लि. मध्ये ५२ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने खासगी इक्विटी फर्म एव्हरस्टोन ग्रुप कडून ३५ टक्के हिस्सा खरेदी करून कंपनीमध्ये नियंत्रक हिस्सा खरेदी केला. रिलायन्सने अतिरिक्त १७ टक्के हिस्साही खरेदी केला. 

Reliance Industries ची डिझायनर ब्रँडमध्ये ही दुसरी गुंतवणूक आहे. रितिका प्रायव्हेट लिमिटेडकडे रितू कुमार, लेबल रितू कुमार, आरआय रितू कुमार, आर्के अँड रितू कुमार होम अँड लिव्हिंग ब्रँडचं स्वामित्व आहे. "आम्ही एकत्र मिळून स्वदेशी टेक्सटाईल्स आणि क्राफ्ट्ससाठी भारत आणि संपूर्ण जगात एक मजबूत प्लॅटफॉर्म आणि कस्टमर इकोसिस्टम तयार करू इच्छित आहोत. आपल्या क्राफ्ट्सना आंतरराष्ट्रीय ओळख आणि सन्मान मिळावा, ज्याचा तो हक्क आहे," अशी प्रतिक्रिया रिलायन्स रिटेलच्या डायरेक्टर ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी दिली. 

"रितू कुमार यांच्यासोबत भागीदारी करुन आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी आपल्या ब्रान्डला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. यामध्ये विस्ताराची क्षमता आहे. तसंच याच्या फॅशन आणि रिटेलमध्ये इनोव्हेशनही आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. ७६ वर्षीय रितू कुमार यांनी १९६९ मध्ये या कंपनीची सुरूवात केली होती. यादरम्यान त्यांनी अनेक ब्रँड्स तयार केले. दररोजच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या कपड्यांसाठी त्यांनी याच वर्षी मार्च महिन्यात Aarké हा ब्रँड लाँच केला होता. कंपनी आपल्या चार फॅशन लेबलसह देश परदेशात विक्रीसाठी १५१ स्टोअर्स आहेत.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीफॅशन