Join us

मुकेश अंबानी यांचा नवा ‘गेम प्लॅन!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:04 IST

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत अंबानींची चर्चा

मुंबई : जगभरातील तरुण आणि लहान मुलांना ऑनलाईन गेमची लागलेली चटक, त्यातील संधी आणि मिळू शकणारा नफा, हे पाहून मुकेश अंबानी यांनी ऑनलाईन गेमिंगच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे सूचित केले आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला मुंबईत आले असून, मुकेश अंबानी यांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत गेमिंग इंडस्ट्रीची वेगाने होणारी वाढ आणि त्यातील व्यावसायिक संधी यांचा उल्लेख केला. पुढील दशक ऑनलाईन गेमिंगचे म्हणजेच गेमिंग इंडस्ट्रीचे असेल, हे ओळखून त्यात रिलायन्सच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत.गेमिंगशी पूरक व्यवसायआधी रिलायन्स जिओची सेवा, त्यानंतर अनेक वाहिन्या विकत घेणे, केबल व्यवसायात केलेला प्रवेश यानंतर मुकेश अंबानी यांना गेमिंग व्यवसाय खुणावत असावा, असे दिसते. वरील तिन्ही व्यवसाय गेमिंग इंडस्ट्रीला पूरक आहेत. त्यामुळेच ते त्याकडे वळतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :मुकेश अंबानी