Join us

लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:07 IST

Mukesh Ambani Jio: मुकेश अंबानी लवकरच UPI सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

Jio UPI Payments: देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Jioने दूरसंचार क्षेत्रात मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा देऊन मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. टेलिकॉम उद्योगात इतिहास रचल्यानंतर आता मुकेश अंबानी लवकरच UPI उद्योग काबीज करण्याच्या तयारीत आहेत. या सेगमेंटमध्ये Jio आल्यानंतर PhonePe आणि Paytm ला तगडी स्पर्धा मिळेल. 

पेटीएमचे संकट जिओसाठी फायद्याचे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jio लवकरच पेमेंट साउंडबॉक्स (Jio Soundbox) बाजारात आणण्याचा विचारात आहे. याची थेट स्पर्धा पेटीएम साउंडबॉक्सशी असेल. जिओकडून या साउंडबॉक्सची चाचणीही सुरू झाली आहे. सध्या या सेगमेंटमध्ये अनेक ॲप्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. दरम्यान, पेटीएमविरोधात आरबीआयने केलेल्या कारवाईचा मोठा फायदा मुकेश अंबानींच्या जिओला मिळू शकतो.

ग्राहकांना आकर्षक सूट मिळू शकतेUPI मार्केट काबीज करण्यासाठी मुकेश अंबानी ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर देऊ शकतात. जिओच्या या प्लॅनमुळे इतर कंपन्यांची चिंता खूप वाढली आहे. पेटीएमवर लावलेल्या बंदीचा थेट फायदा जिओला मिळू शकतो. दरम्यान, सध्या फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे आणि पेटीएम ॲप बाजारात उपलब्ध आहेत. अलीकडेच फ्लिपकार्टने देखील बाजारात UPI सेवेची सुविधा सुरू केली आहे. फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने UPI सुविधा सुरू केली आहे. आता यात जिओची भर पडेल.

टॅग्स :जिओपे-टीएमव्यवसायगुंतवणूक