Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींनी 1.11 कोटी रुपये तिरुमला मंदिराला केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:18 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(आरआईएल)चे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी भगवान वेंकटेश्वर मंदिराला 1.11 कोटी रुपये दान केले आहेत.

नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(आरआईएल)चे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी भगवान वेंकटेश्वर मंदिराला 1.11 कोटी रुपये दान केले आहेत. तिरुमला वेंकटेश्वर मंदिरातल्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. ही रक्कम प्रसिद्ध डोंगरावर असलेल्या मंदिराला दान स्वरूपात देण्यात आली. गरजू आणि गरिबांच्या उपचारासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बनवण्यात आली आहे, मुकेश अंबानींनी ही रक्कम या ट्रस्टलाच दान केली.मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं प्रतिनिधित्व करणारे कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद यांनी तिरुपती मंदिरात प्रार्थना केल्यानंतर टीटीडीचे संयुक्त कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 1.11 कोटींचा डिमांड ड्राफ्ट सोपवला आहे. मुकेश अंबानींनी दान केलेल्या रकमेचा वापर तिरुपती मंदिर चालवत असलेल्या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात मोफत चिकित्सा सुविधा प्रदान करण्यासाठी केला जाणार आहे. आरआईएलनं सप्टेंबरमध्येही 1.11 कोटी रुपयांचं दान दिलं होतं. देशभरात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांचं नाव वरच्या स्थानी आहे. संस्थेच्या अहवालानुसार ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2018दरम्यान मुकेश अंबानींनी वर्षभरात वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात 400हून अधिक कोटी रुपयांचं दान केलं आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी पिरामल समूहाचे अजय पिरामल हे आहेत. त्यांनी 200 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दिले होते. 

टॅग्स :मुकेश अंबानी