Reliance Consumer Product: मुकेश अंबानी यांची कंपनी आणखी एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स पॅकेज्ड फूड ब्रँड एसआयएल फूड इंडियाचे (SIL Food India) अधिग्रहण करू शकते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये जॅम, मेयोनीज, कुकिंग पेस्ट, चायनीज सॉस आणि बेक्ड बीन्स सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. पुण्यातील एसआयएल फूड इंडिया ही कंपनी प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिणेकडील बाजारपेठेत कार्यरत आहे.
काय आहे डिटेल्स?
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स पॅकेज्ड फूड ब्रँड एसआयएल खरेदी करू शकते. अधिग्रहणाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) एचयूएल, टाटा कन्झ्युमर आणि क्रेमिका सारख्या एफएमसीजी प्रमुख कंपन्यांना जोरदार टक्कर देऊ शकते. या अधिग्रहणात रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सनं एसआयएल ब्रँडचं विद्यमान मालक फूड सर्व्हिस इंडियाकडून अधिग्रहणाचा समावेश आहे.
कंपनीच्या बाबत माहिती
एसआयएल फूड इंडिया ही आधी जेम्स स्मिथ अँड कंपनी म्हणून ओळखले जात होती. १९९३ मध्ये मॅरिको इंडस्ट्रीजने पहिल्यांदा त्याचं अधिग्रहण केलं होतं. त्यानंतर मॅरिकोनं डेन्मार्कच्या गुड फूड ग्रुपची उपकंपनी असलेल्या स्कॅन्डिक फूड इंडियाला हा व्यवसाय विकला. २०२१ मध्ये, फूड सर्व्हिस इंडियानं (जी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजला सीजनिंग, मसाले पुरवते) एसआयएल फूड्सचं अधिग्रहण केलं.