Join us  

मोठी भविष्यवाणी! आताची घसरण तात्पुरती; शेअर मार्केट ८० हजार अंकांवर जाणार, ‘या’ क्षेत्रात दिसेल तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 4:34 PM

शेअर मार्केटची चढ-उताराची स्थिती तात्पुरती असून, येत्या काही काळात निर्देशांक ८० हजारांचा टप्पा पार करेल, असे मोठे भाकित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, यामुळे भारतासह आशियातील भांडवली बाजारांना जोरदार तडाखे दिल्याचे पाहायला मिळत आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये ४०० अंकांची पडझड झाली. या प्रचंड आपटीने बाजारात साडे सहा लाख कोटींचा चुराडा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे मॉर्गन स्टॅनले अहवालात शेअर मार्केटमधील चढ-उताराची परिस्थिती तात्पुरती असून, येत्या काही काळात शेअर मार्केट ८० हजार अंकांचा टप्पा पार करेल, असे मोठे भाकित करण्यात आले आहे. 

मॉर्गन स्टॅनलेच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२२ पर्यंत शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येऊ शकते. शेअर मार्केटचा निर्देशांक ८० हजारांचा आकडा पार करणार करू शकेल. यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली सुधारणा आणि नियंत्रित कोरोना परिस्थिती कायम राहणे आवश्यक आहे, असे म्हटले गेले आहे. 

‘या’ क्षेत्रात दिसेल तेजी

मॉर्गन स्टॅनलेने आपल्या अहवालात आगामी वर्ष २०२२ मध्ये भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणक होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या क्षेत्रातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे, यासंदर्भातही सविस्तर माहिती दिलेली आहे. यानुसार, क्लीन एनर्जी, डिफेन्स सेक्टर, रिअल इस्टेट, ऑटो, फायनान्शिएल, इन्शुरन्स, डिजिटल ट्रान्फॉर्मेशन, हायपर लोकल ट्रान्फॉर्मेशन या सेक्टरवर गुंतवणूकदारांनी भर द्यायला हवा. या सेक्टरमध्ये जास्त प्रगती होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. 

परकीय गुंतवणूक वाढून २ हजार कोटी डॉलर्स जाण्याची शक्यता

भारतातील परकीय गुंतवणूक वाढून २ हजार कोटी डॉलर्स इतकी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण, कच्च्या तेलाच्या कमी किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, या गोष्टी सुलभ राहिल्यास शेअर मार्केट निर्देशांक किमान ७० हजारांवर जाण्यास काहीच अडचण येऊ नये, असे मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे, ब्रोकरज फर्म यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत भारतीय शेअर मार्केट ७० हजारांचा टप्पा गाठू शकेल, असा दावा केला आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी शेअर मार्केटने आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे ६२ हजार २४५ अंकांचा विक्रमी स्तर गाठला होता. तसेच राष्ट्रीय निर्देशांक निफ्टीनेही आतापर्यंतचा सर्वोच्च १८ हजार ६०४ अंकांचा स्तर गाठला होता. गेल्या १८ महिन्यांमध्ये शेअर मार्केटने दमदार कामगिरी केली आहे. गुंतवणुकीतही वाढ झालेली पाहायला मिळत असून, अनेकविध क्षेत्रांतील विविध कंपन्यांचे आयपीओ सादर होत आहेत.  

टॅग्स :शेअर बाजार