Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांना EMI भरता येईना; मिळकतीपेक्षा हप्त्यांचा बोजा झाला अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:05 IST

का वाढले कर्जाचे ओझे? जाणून घ्या सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८५% कर्जदार आपली मासिक मिळकत केवळ कर्जाचे हप्ते (ईएमआय) भरण्यासाठी खर्च करत आहेत, तरीही त्यांना आर्थिक ओझे पेलणे अशक्य होत आहे. विशेषतः ३५,००० ते ६५,००० रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये हे संकट अधिक गडद झाले असून, त्यांचे हप्तेच २८,००० ते ५२,००० रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे.

का वाढले कर्जाचे ओझे?

  • नोकरकपात आणि वेतनकपात: २८% लोकांवर नोकरी जाण्यामुळे, वेतनकपातीमुळे हप्ते थकण्याची वेळ आली आहे.
  • वैद्यकीय आणीबाणी: २४% अचानक आलेल्या आजारपणामुळे कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.
  • व्यवसायातील तोटा: २२% लोकांना व्यवसायातील मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे हप्ते भरणे कठीण.
  • ४०% कर्जदार क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या कार्डचा आधार घेत आहेत किंवा नवीन कर्ज काढत आहेत, अशी माहिती आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Middle Class Struggles: EMI Payments Exceeding Income, a Growing Burden

Web Summary : Middle-income families face a debt crisis, with 85% spending their entire income on EMIs. Job losses, medical emergencies, and business downturns contribute to this burden. Many resort to new loans for credit card payments, worsening the situation.
टॅग्स :वैद्यकीय