Join us

मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:28 IST

Microsoft OpenAI Partnership: मायक्रोसॉफ्टला २०२३ पर्यंत OpenAI च्या सर्व तंत्रज्ञानाचा विशेष  प्रवेश; कंपनीने ‘नॉन-प्रॉफिट’ वरून ‘पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन’मध्ये केले रूपांतरण

नवी दिल्ली: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआय यांनी एका ऐतिहासिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार १३५ अब्ज डॉलर (₹११,२०,००० कोटींहून अधिक) इतक्या मोठ्या रकमेचा असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कॉर्पोरेट डील ठरली आहे.

या नवीन आणि भव्य करारानुसार, मायक्रोसॉफ्टला २०३२ सालापर्यंत ओपन एआयच्या सर्व तंत्रज्ञान मॉडेल्सचा विशेष प्रवेश मिळेल. यामध्ये भविष्यात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स क्षमता प्राप्त करू शकणाऱ्या मॉडेल्सचाही समावेश आहे. AGI म्हणजे असे AI जे मानवापेक्षा अधिक कार्यक्षम सिद्ध होतील.

OpenAI ची पुनर्रचना

या कराराच्या घोषणेसोबतच ओपन एआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्वतःला नॉन-प्रॉफिट संस्थेमधून आता पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन  मध्ये रूपांतरित केले आहे. सुमारे एक वर्ष चाललेल्या वाटाघाटीनंतर ओपन एआयने मायक्रोसॉफ्टला २७ टक्के भागीदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ओपन एआयचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी सांगितले की, "ओपन एआयने आपली पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण केली आहे. नॉन-प्रॉफिट युनिटचे नियंत्रण कायम राहील, पण कंपनीला आता AGI येण्यापूर्वी मोठे संसाधने थेट उपलब्ध होतील." या नवीन करारामुळे AI क्षेत्रात सतत सहयोग आणि जबाबदार प्रगतीसाठी एक मजबूत पाया तयार झाल्याचे दोन्ही संस्थांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Microsoft Invests Big in OpenAI: A Historic AI Deal

Web Summary : Microsoft and OpenAI inked a historic $135 billion AI deal. Microsoft gains exclusive access to OpenAI's tech, including future AGI models. OpenAI restructured, granting Microsoft a 27% stake, facilitating AI advancement responsibly.
टॅग्स :मायक्रोसॉफ्ट विंडोआर्टिफिशिअल इंटेलिजन्स