Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात देवदूत ठरली कंपनी! कर्मचाऱ्यांना देणार १.१२ लाखांचा बोनस, कारण ऐकूनही वाटेल लयभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:02 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही एक कंपनी अशी आहे की जिनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचं संकट ओढावलं आणि यात अनेक कंपन्यांचा कारभार थंडावला. यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, तर अनेक कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट करावी लागली. जगात अशी भयानक परिस्थिती सुरू असतानाही एक कंपनी अशी आहे की जिनं सर्वांचं मन जिंकलं आहे. कारण कोरोना काळातही कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल १ लाख १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं आहे. (Microsoft Is Giving Rs 1.12 Lakh To Each Employee As Pandemic Bonus)

मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १,५०० यूएस डॉलर्स (जवळपास १ लाख १२ हजार रुपये) बोनस म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामागचं कारण देखील प्रत्येकाचं मन जिंकणारं असंच आहे. सध्याचं आव्हानात्मक आर्थिक वर्ष लक्षात घेता कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बोनस देण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

पार्ट टाइम कर्मचाऱ्यांनाही मिळणार बोनस'द वर्ज'नं  जाहीर केलेल्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेटमध्ये उपाध्यक्ष स्तराखालील सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. यात पार्टटाइम आणि दर तासांच्या करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

जगभरात १ लाख ७५ हजार ५०८ कर्मचाऱ्यांना फायदामायक्रोसॉफ्ट कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर कॅथलीन व्होगर यांनी कर्मचाऱ्यांना महामारी विशेष बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा लाभ अमेरिकेसह सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीच्या सर्व योग्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सद्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संपूर्ण जगभरात १ लाख ७५ हजार ५०८ कर्मचारी आहेत. 

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही. म्हणजेच लिंक्डइन, गिटहब आणि जेनीमॅक्ससारख्या कंपन्यांचे कर्मचारी या बोनससाठी पात्र ठरणार नाहीत. याशिवाय सप्टेंबर महिन्यापर्यंत कंपनीची कार्यालयं सुरू करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टनं घेतला आहे. यात वॉशिग्टन स्थित मुख्यालय आणि परिसरातील इतर कार्यालयं सुरू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मायक्रोसॉफ्टची २१ देशांमध्ये कार्यालयं आहेत. 

विशेष म्हणजे याआधी फेसबुक आणि अॅमेझॉन कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यात फेसबुकच्या ४५ हजार कर्मचाऱ्यांना १ हजार डॉलर्सचा बोनस जाहीर करण्यात आला होता. तर अॅमेझॉननं फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी ३०० डॉलर्सचा हॉलीडे बोनस जाहीर केला होता. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या