Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने पुन्हा दिला ३०० कर्मचाऱ्यांना नारळ; ‘एआय’ हेच ठरतेय का कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:05 IST

काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने कित्येक वर्षांतील मोठी कर्मचारी कपात जाहीर केली होती.

वॉशिंग्टन: तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टने कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू ठेवताना सोमवारी आणखी ३०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने कित्येक वर्षांतील मोठी कर्मचारी कपात जाहीर केली होती.

प्राप्त माहितीनुसार, ताज्या कर्मचारी कपातीत कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिलेली नाही. गेल्या महिन्यात कंपनीने ६ हजार लोकांना कामावरून काढले होते. ही कंपनीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कर्मचारी कपात ठरली होती. २०२३ मध्ये सर्वांत मोठी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात कंपनीने केली होती.

‘एआय’ हेच कारण?

नडेला यांचे वक्तव्य एआयने बदललेल्या कार्यपद्धतीकडे निर्देश करते. या  क्षेत्रात कंपनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. सोमवारी कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना काढले याची माहिती दिलेली नाही. सॉफ्टवेअर अभियंते व प्रकल्प व्यवस्थापक यांना  काढले असावे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टॅग्स :मायक्रोसॉफ्ट विंडोनोकरी