Join us  

Jio Cinema आणि Disney Hotstar चं होणार मर्जर? मुकेश अंबानींकडे मालकी हक्क, डील जवळपास निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:06 PM

स्टार इंडिया आणि वायकॉम १८ मर्जर अॅग्रीमेंट जवळपास अंतिम झालं आहे.

झी आणि सोनी (Zee-Sony Merger) यांच्यातील डील भलेही झाली नसेल तरी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि डिस्ने  (Walt Disney) यांच्यातील करार जवळपास पूर्ण झाला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा पुढील टप्प्यात आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार इंडिया आणि वायकॉम १८ मर्जर अॅग्रीमेंट जवळपास अंतिम झालं आहे. 

जर हे मर्जर पूर्ण झालं तर ते भारतातील सर्वात मोठे मीडिया साम्राज्य बनेल. ज्याचा विस्तार १०० टीव्ही चॅनेल आणि २ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत आहे. 

कोणाकडे किती हिस्सा? 

Star-Viacom18 मर्जरनंतर, रिलायन्सकडे ५१ टक्के भागीदारी असू शकते. त्याच वेळी, ४० टक्के हिस्सा डिस्नेकडे जाऊ शकतो. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने याची पुष्टी केली आहे. उदय शंकर आणि जेम्स मर्डोक यांच्या बोधी ट्रीचा विलीनीकरण झालेल्या संस्थेत ७ ते ९ टक्के हिस्सा असू शकतो. एक सब्सिडायरी म्हणून स्थापन करता यावी म्हणून विलीनीकरणानंतर रिलायन्स त्यात अधिक पैसे गुंतवू शकते, असं एका व्यक्तीनं म्हटलं. 

रिपोर्टनुसार, क्रिकेट राईट्समध्ये नुकसान आणि डिस्ने हॉटस्टारचे कमी होणारे सबस्क्रायबर्स यामुळे या मर्जर युनिटचं मूल्य ८ बिलियन डॉलर्स आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानी