Join us
Daily Top 2Weekly Top 5

MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

By जयदीप दाभोळकर | Updated: October 27, 2025 14:42 IST

एमसीएक्सवर सकाळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आज सराफा बाजारात भाव वाढू लागले. आज सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी छठच्या निमित्तानं सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.

Gold Silver Price Today: एमसीएक्सवर सकाळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आज सराफा बाजारात भाव वाढू लागले. आज सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी छठच्या निमित्तानं चांदीच्या दरात ९९७ रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर, सोन्याच्या भावात ८८४ रुपयांची तेजी दिसून आली आहे. आता सोनं १७ ऑक्टोबरच्या उच्चांकी दरापेक्षा ८४७२ रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या उच्चांकी दरापेक्षा ३००७० रुपयांनी घसरले आहेत.

जीएसटी (GST) सह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता प्रति १० ग्रॅम १२६०७४ रुपये झाला आहे, तर चांदी जीएसटीसह प्रति किलो १५२४४० रुपयांवर पोहोचलीये.

AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

आयबीजेएनुसार, २४ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोनं जीएसटीशिवाय १२१५१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. दुसरीकडे, चांदी देखील जीएसटीशिवाय प्रति किलो १४७०३३ रुपयांवर बंद झाली होती. आज सोनं जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १२२४०२ रुपयांच्या दरानं उघडलं आणि चांदी १४८०३० रुपयांवर उघडली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ वाजण्याच्या आसपास द जाहीर केले जातात.

कॅरेटनुसार सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा दरही ८८१ रुपयांनी महाग होऊन प्रति १० ग्रॅम १२१९१२ रुपयांच्या भावानं उघडला. जीएसटीसह त्याची किंमत आता १२५५६९ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

२२ कॅरेट सोन्याची किंमत ८१० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ११२१२० रुपयांवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत ११५४८३ रुपये झालीये.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

१८ कॅरेट सोनं ६६३ रुपयांच्या तेजीसह प्रति १० ग्रॅम ९१८०२ रुपयांवर पोहोचलेत आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९४५५६ रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षात सोनं प्रति १० ग्रॅम ४६६६२ रुपयांनी महाग झालं आहे, तर चांदी प्रति किलो ६२०१३ रुपयांनी वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver prices rise in Sarafa market despite MCX dip.

Web Summary : Despite MCX declines, gold and silver prices surged in the Sarafa market, driven by Chhath festival demand. Gold is now ₹8472 cheaper than its peak.
टॅग्स :सोनंचांदी