नवी दिल्ली - मारुती सुझुकीची इ-व्हिटारा पूर्णपणे पर्यावरणस्नेही, भविष्याचा वेध घेणारी, प्रीमियम अनुभव देणारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी आहे. या कारने भारताची नावीन्यपूर्णत: आणि कल्पकता जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने ७ एअरबॅग्ससह अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत.
इ-व्हिटारा कार कार्बन कमी करण्याच्या मारुती सुझुकीच्या प्रवासातील एक मोठे पाऊल आहे. नव्या विशेष प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही कार वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि प्रीमियम अनुभव देते. सुरक्षिततेला प्राधान्य देताना कारमध्ये लेव्हल २ एडीएएस तंत्रज्ञान दिले आहे. नेक्स्ट-जेन सुझुकीची ही कार ६० हून अधिक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. कारमध्ये स्मार्ट होम चार्जर्सची सुविधा दिली आहे. फास्ट डीसी चार्जर्स व सोप्या चार्जिंगसाठी विशेष ॲपही दिले जाणार आहे. भारतात तयार केलेली ही कार जगातील १०० हून अधिक बाजारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. इ-व्हिटाराची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ या धोरणाशी सुसंगत आहे. (वा. प्र.)