Join us

बाजार वधारला; निर्देशांकांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 03:56 IST

सेन्सेक्स आणि निफ्टीसह अन्य क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली. सलग दुसऱ्या सत्रामध्ये निर्देशांक वाढून बंद झाला.

मुंबई : सरकारकडून आणखी पॅकेज मिळण्याची अपेक्षा वाढल्याने बाजारामध्ये मंगळवारी फायनान्स क्षेत्राच्या समभागांची मोठी खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीसह अन्य क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली. सलग दुसऱ्या सत्रामध्ये निर्देशांक वाढून बंद झाला.मंगळवारी बाजाराचा प्रारंभ हा तेजीनेच झाला. त्यानंतर काही काळ बाजार थोडा खाली आला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७१.४४ अंशांनी वाढून ३१,११४.५२ अंशांवर बंद झाला. निफ्टी ९८.६० अंशांनी वर जाऊन ९,३८०.९० अंशांवर बंद झाला.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने म्युच्युअल फंडांना दिलेल्या सहाय्यानंतर आता उद्योगांनाही सहाय्य देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने त्या आधारावर बाजारात मोठ्या प्रमाणात फायनान्समधील समभागांची खरेदी केली गेली. आशियामधील अन्य शेअर बाजारांमध्ये असलेल्या सकारात्मक वातावरणाचा लाभही भारतात झालेला दिसून आला.