Join us  

बाजाराच्या निर्देशांकांनी मारली चार महिन्यांतील उच्चांकी धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:14 AM

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. बाजाराचा प्रारंभ हा निराशामय वातावरणामध्ये झाला. मात्र त्यानंतर बाजार सतत दोलायमान राहिला असला तरी त्यामध्ये तेजीचे पारडे जड राहिले.

- प्रसाद गो. जोशीलॉकडाऊन संपल्यानंतर सुरू झालेले आर्थिक व औद्योगिक व्यवहार, तसेच अमेरिकेसह जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरण, रुपयाचे वाढत असलेले मूल्य आणि बाजारामध्ये होत असलेली खरेदी या जोडीलाच कोविड-१९वरील लस शोधण्यातील प्रगती यामुळे शेअर बाजाराच्यानिर्देशांकांनी चार महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे.मुंबईशेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. बाजाराचा प्रारंभ हा निराशामय वातावरणामध्ये झाला. मात्र त्यानंतर बाजार सतत दोलायमान राहिला असला तरी त्यामध्ये तेजीचे पारडे जड राहिले. बाजाराचे बहुसंख्य निर्देशांक वाढले. मात्र त्यामध्ये अपवाद ठरला तो स्मॉलकॅप निर्देशांकाचा. हा निर्देशांक थोड्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचे दिसून आले. देशातील कोविड-१९च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या शक्यतेने बाजारावर विक्रीचे थोडे दडपण आले. मात्र यावर लस लवकरच उपलब्ध होण्याने वातावरण बदलले. गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी ५,३३३.०२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली मात्र देशी वित्तसंस्थांनी ५०४१.२५ कोटी रुपयांची खरेदी करून बाजार खाली पडू दिला नाही. अमेरिकेमधील कमी झालेली बेरोजगारी आणि तेथील उद्योगांमध्ये सुरू झालेले कामकाज यामुळे नॅस्डॅकने आतापर्यंतचा उच्चांक नोंदविलेला दिसून आला आहे.१० कंपन्यांचे भांडवल  १.३७ लाख कोटी वाढलेच्सेन्सेक्समधील पहिल्या दहा कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये गतसप्ताहात १.३७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचडीएफसी यांच्या बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकमुंबईभारत