Join us
Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यात सु्ट्ट्याच सुट्या, एवढे दिवस राहणार बँका बंद, आधीच करून ठेवा प्लॅनिंग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:33 IST

March Holidays List: रविवारपासून मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सणांची रेलचेल असल्याने बँकांसह विविध सरकारी आस्थापनांचं कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे.

रविवारपासून मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सणांची रेलचेल असल्याने बँकांसह विविध सरकारी आस्थापनांचं कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे. मार्च महिन्यात होळी, धुलिवंदन, गुढी पाडवा, रमजान ईद, राम नवमी असे सण आहेत. त्यामुळे या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक महत्त्वानुसार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये बँकेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही सरकारी कामासाठी आतापासूनच नियोजन करून ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

मार्च महिन्यामध्ये १, ८, १५, २२ आणि २९ तारखेला मिळून एकूण ५ रविवार येत आहेत. त्यामुळे या तारखांना बँकांना सुट्टी असेल. त्याबरोबरच १४ आणि २८ मार्च रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. एकूण रविवारची साप्ताहित सुट्टी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी मिळून ७ दिवस बँकांचं कामकाज बंद राहील.

त्या बरोबरच ३ मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनानिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. तर १९ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त बँकांचं कामकाज बंद राहील. तसेच २१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. तर २६ मार्च रोजी बँकांना रामनवमीची सुट्टी राहणार आहे. याशिवाय देशातील विविध भागात तिथल्या स्थानिक सणांनुसार बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.

एकूणच मार्च महिन्यात पाच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि धुलिवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी अशा मिळून ११ दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.  

मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे रविवार - १, ८, १५, २२, २९ मार्चदुसरा आणि चौथा शनिवार, १४ आणि २८ मार्चधुलिवंदन - ३ मार्च गुढीपाडवा - १९ मार्च रमजान ईद - २१ मार्च रामनवमी - २६ मार्च  

English
हिंदी सारांश
Web Title : March Packed with Holidays: Banks Closed for Several Days!

Web Summary : March brings numerous holidays including Holi, Gudi Padwa, Ramadan Eid, and Ram Navami. Banks will be closed for 11 days due to Sundays, second and fourth Saturdays, and festivals. Plan your bank work accordingly.
टॅग्स :सुट्टीबँकिंग क्षेत्रबँक