लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माझे अनेक डीपफेक (खोटे) व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून, लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी सायबर संरक्षण अधिक मजबूत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.
‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, तंत्रज्ञान, साधनांचा वापर फसवणुकीसाठी आणि दिशाभूल करण्यासाठी केला जाऊ शकतो. माझेच अनेक डीपफेक व्हिडीओ बनवून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.
गुन्हेगार डेटा नव्हे, तर विश्वास हॅक करत आहेतसीतारामन म्हणाल्या की, आजचे गुन्हेगार एआय वापरून आवाज, ओळख आणि चेहरा बनावट तयार करतात. म्हणजेच ते आता डेटा नव्हे, तर विश्वास हॅक करत आहेत. यावर फिनटेक कंपन्या, गुंतवणूकदार आणि नियामक संस्था असे सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. तसेच, प्रणाली सुरक्षित, सर्वसमावेशक, टिकाऊ असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
Web Summary : Finance Minister Nirmala Sitharaman revealed that deepfake videos of her are circulating online. She emphasized the urgent need for stronger cyber security to maintain public trust, as criminals now use AI to manipulate voices, identities, and faces, hacking trust rather than data. Collaborative efforts are crucial.
Web Summary : वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने खुलासा किया कि उनके डीपफेक वीडियो ऑनलाइन प्रसारित हो रहे हैं। उन्होंने सार्वजनिक विश्वास बनाए रखने के लिए मजबूत साइबर सुरक्षा की तत्काल आवश्यकता पर जोर दिया, क्योंकि अपराधी अब आवाज, पहचान और चेहरे में हेरफेर करने के लिए एआई का उपयोग कर रहे हैं, जो डेटा के बजाय विश्वास को हैक कर रहे हैं। सहयोगात्मक प्रयास महत्वपूर्ण हैं।