Join us

महिंद्रने केली ३०० अधिकाऱ्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 05:26 IST

चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या विक्रीमध्ये  २७.५२ टक्के घट झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीच्या मोबिलिटी सर्व्हिसेसचे अध्यक्ष पार्थसारथी यांच्यासह सुमारे ३०० अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महिंद्र ॲण्ड महिंद्रला मंदीचा फटका बसत असून, कंपनीने या वर्षाच्या प्रारंभापासून सुमारे ३०० अधिकाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन निर्मिती उद्योगाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून, महिंद्रच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनला ले ऑफला सामोरे जावे लागले आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या विक्रीमध्ये  २७.५२ टक्के घट झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीच्या मोबिलिटी सर्व्हिसेसचे अध्यक्ष पार्थसारथी यांच्यासह सुमारे ३०० अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांच्या कामकाजामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :महिंद्रानोकरी