Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीत महाराष्ट्र पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 08:13 IST

इंधनजन्य पदार्थांवर लावलेल्या करांपोटी केंद्र सरकारला ४० लाख ४२ हजार ३८८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यातील सर्वाधिक कर महाराष्ट्रातून गोळा झाला आहे.

चंद्रशेखर बर्वे -

नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलडिझेल यांसारख्या पेट्रोलियम पदार्थांची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. इंधनजन्य पदार्थांवर लावलेल्या करांपोटी केंद्र सरकारला ४० लाख ४२ हजार ३८८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यातील सर्वाधिक कर महाराष्ट्रातून गोळा झाला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम पदार्थांवर लावलेल्या करापोटी केंद्र सरकारला मागील पाच वर्षांत ४० लाख ४२ हजार ३८८ कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. यात सर्वांत मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे. गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्राने करापोटी एक लाख ५१ हजार ५१६ कोटी रुपयांची भर घातली आहे. यामुळे, गॅस, पेट्रोल व डिझेलचा सर्वाधिक खप महाराष्ट्रात होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

कच्च्या तेलावर लावलेल्या विविध करापोटी सरकारला ४०,४२,३८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

उज्ज्वला योजनेची देशात १० कोटी कनेक्शन -पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात १० कोटी ५० लाख ९९ हजार ४१६ कनेक्शन देण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील ५२ लाख ३७ हजार ८९७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक कनेक्शन उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि मध्यप्रदेशात देण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Leads in Petroleum Product Sales, Highest Tax Contributor

Web Summary : Maharashtra tops petroleum sales, contributing most to the central government's ₹40.42 lakh crore revenue from fuel taxes. The state contributed ₹1.51 lakh crore in six years. Ten crore LPG connections were provided nationwide under the Ujjwala scheme.
टॅग्स :पेट्रोलडिझेल