नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत 22.5 रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं दिलं आहे.या किमती 1 मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी 502 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी 730हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. 1 एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.
सामान्य माणसाला मोठा झटका, घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 12:53 IST