केंद्र सरकारने अनेक जीवनावश्यक आणि दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्या बैठकीत जीएसटीचे १२ आणि २८ टक्क्यांचे स्लॅब हटवून केवळ ५ आणि १२ टक्क्यांचे स्लॅबच ठेवण्यात आले होते. जीएसटीमधील ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होणार असून, अन्नपदार्थांपासून ते कार, एसी, टीव्ही अशा वस्तूही स्वस्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वापरातील एलपीजी गॅसही २२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू २२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरही स्वस्त होणार का याबाबतचा शोध लोकांकडून इंटरनेटवर सर्च मारून घेतला जात आहे. तसेच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात होणार की नाही, याबाबत चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटी कपातीमुळे सिलेंडरच्या दरात घट होणार की नाही, तसेच सिलेंडरवर सध्या किती जीएसटी लागतो, याबाबत जाणून घेऊयात.
सरकार घरगुती सिलेंडर आणि व्यावसाययिक वापराच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारते. घरगुती सिलेंडरवर ५ टक्के जीएसटी आकारते. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटी कौन्सिलकडून एलपीजी सिलेंडर सिलेंडरवरील जीएसटीतील बदलाबाबत घोषणा केलेली नाही. याचा अर्थ एलपीजीवर जीएसटी कमी होणार नाही.
२२ सप्टेंबरपासून होणाऱ्या जीएसटी कपातीनंतरही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एसपीजी सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक वापराचे दर जैसे थे राहणार आहेत.