Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG Cylinder Price: ‘ही’ कंपनी देतेय केवळ ७५० रूपयांत सिलिंडर, फटाफट करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 22:48 IST

सरकारी मालकीच्या कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे.

जर तुम्ही देखील गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर सरकारी मालकीची कंपनी इंडेनने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला गॅस सिलिंडर स्वस्तात मिळू शकेल. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल. म्हणजेच तुम्हाला हा गॅस सिलिंडर सुमारे 300 रुपयांनी स्वस्त मिळेल.

इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त 750 रुपये खर्च करावे लागतील. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. सध्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत आहे. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला 750 रुपयांना सिलिंडर दिला जात आहे. एकूणच, तुम्हाला 300 रुपयांचा स्वस्त सिलिंडर दिला जातोय.

वजन कमीकंपोझिट सिलिंडर वजनाला हलके अशतात. यामध्ये तुम्हाला 10 किलो गॅस मिळतो. यामुळेच या सिलिंडरची किंमत कमी आहे. सध्या 28 पेक्षा अधिक शहरांमध्ये हा सिलिंडर मिळत आहे. कंपनी लवकरच हा सिलिंडर अन्य शहरांमध्येही उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरसरकार