Join us  

LPG सिलिंडर खरेदीवर 30 लाखांचा विमा मोफत मिळणार, कठीण काळात मोठा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 2:05 PM

LPG Cylinder And Insurance : 14 किलो गॅस सिलिंडरबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळतात. या सिलिंडरबरोबरच प्रत्येक ग्राहकांच्या कुटूंबाला विमा देखील दिला जातो.

नवी दिल्ली - एलपीजी सिलिंडर सध्या आपल्या वाढत्या किंमतींमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत सिलिंडरचे भाव वाढले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या 14 किलो गॅस सिलिंडरबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळतात. या सिलिंडरबरोबरच प्रत्येक ग्राहकांच्या कुटूंबाला विमा देखील दिला जातो. प्रत्येक सिलिंडरवर विमा असतो. दुर्दैवाने जर सिलिंडरचा स्फोट झाला किंवा तोटा झाला तर तुम्ही विमा वापरू शकता. या विम्याच्या माध्यमातून तुम्ही नुकसानीची भरपाई करू शकता. एलपीजी सिलिंडर देणार्‍या कंपन्या कोणत्याही अनुचित घटनेविरूद्ध विमा प्रदान करतात. विमा किती प्रकारचे उपलब्ध आहेत हे जाणून घेऊया...

विम्याचे तीन प्रकार आहेत

कंपन्या ग्राहकांना एक ते तीन प्रकारचे विमा देतात. या विम्यात, अपघाती मृत्यू, जखमी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास एलपीजी कंपन्या नुकसान भरपाई म्हणून काही पैसे ग्राहकांना देतात.

कसा मिळेल विमा?

विम्यासही काही अटी आहेत आणि ही घटना कशी घडली आणि काही गोष्टींचा समावेश आहे. तीन प्रकारच्या विम्यात भरपाईची रक्कम बदलते. विम्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर त्या व्यक्तीच्या अनुसार 6 लाख रुपयांचे संरक्षण असते. त्याचवेळी, घटनेत जखमी झालेल्यांसाठी 30 लाख रुपयांचा विमा आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत उपचार केले जाऊ शकतात. कोणतीही मालमत्ता गमावल्यास 2 लाखांपर्यंतचे रकमेचे संरक्षण केले जाऊ शकते.

मोफत मिळणार विमा?

विम्याचे कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. तेल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांकडून प्रीमियम रकमेसाठी कोणतेही शुल्क घेत नाहीत. कोणतीही घटना घडल्यास विमा कंपन्या तेल कंपन्यांना ही रक्कम ट्रान्सफर करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

LPG सिलिंडरसंदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; बदलला 'हा' नियम

येत्या दोन वर्षांत सरकार देशातील लोकांना 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. देशातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळावे यासाठी सरकार उज्ज्वलासारखी योजना चालवित आहे. त्याअंतर्गत येत्या दोन वर्षांत 1 कोटी मोफत एलपीजी कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे, यासाठीचे नियम बदलण्याचीही सरकार तयारी करत आहे. तरुण कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार किमान कागदपत्रांत एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही एलपीजी कनेक्शन देण्याची योजना आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडरभारत