Join us

सरकारकडून होळीचं गिफ्ट, सिलिंडर झाले स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 17:14 IST

एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिले आहे.

नवी दिल्ली - आज भारतामध्ये सर्वजण होळीच्या रंगात नाहून निघतील. त्यातच सरकारने खूशखबर दिली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारने सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केली केली आहे.सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये आणि अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आली आहे. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे. 

अनुदानित गॅसची आता दिल्लीमध्ये 493.09 रुपयांना मिळेल. पूर्वी 495.62 रुपयांना होता. नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत.