LPG Usage Down Middle East War: मध्य-पूर्वेतील युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यानं, देशातील एलपीजीच्या वापरात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात १७.७ टक्क्यांनी घट झाली आहे. उद्योग क्षेत्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली. आकडेवारीनुसार, १५ मार्चपर्यंत देशातील एलपीजीचा वापर कमी होऊन ११.४७ लाख टन झाला आहे, जो गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या १५ दिवसांतील १३.८७ लाख टनांच्या तुलनेत १७.३ टक्क्यांनी कमी आहे.
तसंच, यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांतील १५.५७ लाख टनांच्या मागणीपेक्षा हा वापर २६.३ टक्क्यांनी कमी आहे. भारत आपल्या एकूण गरजेच्या सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो, ज्यातील बहुतांश गॅस इराणच्या नियंत्रणाखालील 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मार्गावरून येतो.
SEBI चा मोठा प्लॅन! आता विना नॉमिनी 'हे' महत्त्वाचं काम करताच येणार नाही, नियम बदलण्याची तयारी
'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद झाल्यानं पुरवठा विस्कळीत
अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मार्ग बंद केला होता. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) होणारा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे, सरकारनं घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हॉटेलसारख्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना आणि उद्योगांना होणाऱ्या एलपीजी पुरवठ्यात कपात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ३ तेल कंपन्यांच्या विक्री आकडेवारीनुसार, १ ते १५ मार्च दरम्यान एलपीजीचा वापर २०२४ च्या याच कालावधीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी आणि २०२३ च्या तुलनेत १०.६ टक्क्यांनी कमी राहिला आहे.
गेल्या काही वर्षांत एलपीजी वापरात सातत्यानं वाढ
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा बाजारपेठेत सुमारे ९० टक्के वाटा आहे. क्लिन एनर्जीला चालना देण्यासाठी सरकारनं लाकूड आणि इतर प्रदूषण पसरवणाऱ्या इंधनांऐवजी एलपीजीचा वापर वाढवल्यामुळे, गेल्या काही वर्षांत एलपीजीच्या वापरात वार्षिक ३ ते ४ टक्क्यांची स्थिर वाढ दिसून आली होती.
एटीएफच्या वापरात घट, पण पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ
युद्धामुळे आखाती देशांनी आपली हवाई हद्द बंद केली होती, ज्याचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला. या काळात विमान कंपन्यांनी खूप कमी विमानं चालवली, ज्यामुळे विमान इंधनाच्या (ATF) वापरावर परिणाम झाला. मार्चच्या पहिल्या १५ दिवसांत एटीएफचा वापर ४ टक्क्यांनी घटून ३,२७,९०० टन झाला. मासिक आधारावर यामध्ये १२.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. युद्धाचा परिणाम झालेल्या या दोन इंधनांव्यतिरिक्त, पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मात्र चांगली वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री १३.२ टक्क्यांनी वाढून सुमारे १५ लाख टन झाली आहे, तर डिझेलचा वापर ८.२ टक्क्यांनी वाढून ३३.८४ लाख टन राहिला आहे.
Web Summary : Middle East conflict disrupted LPG supply, causing a 17% drop in India's usage in early March. 'Strait of Hormuz' closure impacted imports, prompting supply cuts to commercial entities. ATF usage also fell, while petrol and diesel demand surged despite the disruptions.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष ने एलपीजी आपूर्ति बाधित की, जिससे मार्च की शुरुआत में भारत में उपयोग में 17% की गिरावट आई। 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' के बंद होने से आयात प्रभावित हुआ, जिससे वाणिज्यिक संस्थाओं को आपूर्ति में कटौती हुई। एटीएफ का उपयोग भी गिर गया, जबकि व्यवधानों के बावजूद पेट्रोल और डीजल की मांग बढ़ गई।