Join us

Lockdown: स्टेट बँकेंच्या कर्जदारांना धक्का; गृह कर्जावरील व्याजदरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 00:03 IST

कर्जदाते तसेच रिअ‍ॅल्टी क्षेत्राबाबतची जोखीम वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅँकेने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेने गृहकर्जावरील व्याजदरामध्ये ०.३० टक्क्यांनी वाढ केली आहे. याशिवाय बॅँकेने मालमत्तेच्या तारणावरील कर्जाचे व्याजदरही वाढविले आहेत. नवीन दर १ मे पासून अंमलात आणले जाणार आहेत.

कर्जदाते तसेच रिअ‍ॅल्टी क्षेत्राबाबतची जोखीम वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅँकेने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वाढीव दरामध्येही स्टेट बॅँक चढाओढीच्या दरानेच कर्जवाटप करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील महिन्यातच बॅँकेने गृहकर्जावरील व्याजदरामध्ये ०.७५ टक्क्यांनी कपात केली होती.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया