Join us

माेबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा? अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:18 IST

थर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या काेणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फाेन पे यांची हिस्सेदारी ८०%वर पाेहाेचली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेत यूपीआय यंत्रणेमुळे माेठी क्रांती घडली. काेणत्याही शुल्काविना क्षणात पैसे हातातील माेबाइलद्वारे ट्रान्स्फर शक्य झाले. दरराेज काेट्यवधी व्यवहार यूपीआयमार्फत हाेतात. मात्र, या यंत्रणेवर गुगल पे आणि फाेन पे यांची मक्तेदारी आली. ती लवकरच माेडीत निघण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम अर्थात एनसीपीआयतर्फे थर्ड पार्टी यूपीआय पेमेंटसाठी एकूण उलाढालीवर ३० टक्क्यांची मर्यादा टाकण्याचा प्रस्ताव आहे. ३१ डिसेंबरपासून त्याची अंमलबाजावणी करण्याची एनसीपीआयची तयारी आहे. याबाबत आरबीआयसाेबत चर्चा सुरू आहे.

- ७३० काेटी ऑक्टाेबरमध्ये व्यवहार झाले- १२.११ लाख काेटी रुपयांची उलाढाल झाली

गुगल पे, फाेन पेची ८० टक्के हिस्सेदारीथर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या काेणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फाेन पे यांची हिस्सेदारी ८०%वर पाेहाेचली आहे. त्यामुळे बाजारात त्यांची मक्तेदारी वाढली आहे. त्यामुळे एनसीपीआने त्यावर ३० टक्के मर्यादा टाकण्याचा प्रस्ताव दिला हाेता.  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रमोबाइल