Join us

‘लीला’ने थकविले एलआयसीचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 03:57 IST

आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे. ते फेडण्यासाठी कंपनी आता काही हॉटेलांची विक्री करण्याचा विचार करीत आहे.लीला व्हेंचरवर ३,६00 कोटींचे कर्ज आहे. कंपनीने डिसेंबर २00८मध्ये एलआयसीला रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स देऊन ९0 कोटींजे कर्ज घेतले होते. यावरील व्याजदर तीन महिन्यांनी भरणे अपेक्षित आहे. तथापि, १९ सप्टेंबर २0१८ला संपलेल्या तिमाहीतील व्याजाचा २.१२ कोटी रुपयांचा भरणा कंपनीला करता आलेला नाही.