Join us

LIC Unclaimed Amount : आजोबा, वडिलांनी पॉलिसी काढली आणि विसरले! LIC कडे ८८० कोटी पडून, तुमचे आहेत का? असे चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:56 IST

lic unclaimed maturity amount : सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीकडे तब्बल ८८०.९३ कोटी रुपये दाव्याविना पडून आहेत. पॉलिसीधारकांनी क्लेम करुन ही रक्कम काढून घ्यावी असं आवाहन कंपनीने ग्राहकांना केलं आहे.

lic unclaimed maturity amount : अनेकदा आपल्या घरात आजोबा, वडिलांनी वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवलेले असतात. मात्र, ते सांगायचं विसरुन जातात. अशा परिस्थितीत पॉलिसी परिपक्व झाल्याचे माहिती होत नाही. परिणामी हे पैसे क्लेमविना पडून राहतात. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC), देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी म्हणते की, 2023-24 मध्ये तिच्याकडे 880.93 कोटी रुपयांची अनक्लेम मॅच्युरिटी रक्कम पडून आहे. देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे (LIC) २०२३-२४ मध्ये ८८०.९३ कोटी रुपयांची अनक्लेम मॅच्युरिटी रक्कम पडून आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. २०२४ मध्ये ३,७२,२८२ पॉलिसीधारकांनी मुदतपूर्ती पूर्ण होऊनही त्यांचे पैसे घेतले नाहीत. अशा स्थितीत आपल्या पालकांनी काढलेल्या पॉलिसीवर कसा क्लेम करायचा हे माहिती असणे आवश्यक आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड

एलआयसी वेबसाईटवर कसे शोधावे?जर कोणत्याही एलआयसी पॉलिसीधारक किंवा लाभार्थीला एलआयसी पॉलिसी अंतर्गत कोणतीही रक्कम दावा न केलेली आहे का? हे शोधण्यासाठी सर्वप्रथम https://licindia.in/home या वेबसाईटला भेट द्या. ग्राहक सेवेवर क्लिक करा आणि 'पॉलिसीधारकांची अनक्लेम केलेली रक्कम' निवडा. पॉलिसी क्रमांक, नाव (अनिवार्य), जन्मतारीख (अनिवार्य) आणि पॅन कार्ड एंटर करा की माहिती प्रविष्ट करा. माहिती मिळविण्यासाठी 'सबमिट' वर क्लिक करा.

एलआयसीचे पॉलिसीधारकांना आवाहनदावा न केलेली रक्कम कमी करण्यासाठी LIC ने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियामधील जाहिराती तसेच पॉलिसीधारकांना त्यांच्या थकबाकीचा दावा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रेडिओ जिंगल्सचा समावेश आहे. मंत्री पंकज चौधरी म्हणाले की, दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. दावा पूर्ण करण्यासाठी फक्त वैध NEFT आवश्यक आहे.

दावा केला नाही तर या पैशांचं काय होतं?१० वर्षांहून अधिक काळ कोणत्याही रकमेसाठी दावेदार आला नाही तर संपूर्ण रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये जाते. नियमानुसार, हा पैसा वृद्धांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

प्रकरणे का वाढत आहेत?१५ फेब्रुवारी २०२४ च्या IRDAI परिपत्रकानुसार, 'विमा कंपन्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारे काही कारणे समोर आली आहेत. दावा न केलेल्या रकमेत वाढ होण्याचे एक कारण म्हणजे अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे ग्राहकांचा शोध लावला जाऊ शकतो. परंतु, अनेक कारणांमुळे विमा कंपन्या दावे भरू शकत नाहीत.

IRDAI च्या परिपत्रकात काय आहे?IRDAI परिपत्रकानुसार, प्रत्येक विमा कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर १००० रुपये किंवा त्याहून अधिक दावा न केलेल्या रकमेची माहिती प्रदर्शित करणे आवश्यक आहे. ही माहिती १० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :एलआयसीएलआयसी आयपीओगुंतवणूक