LIC Stock Price: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. याचं कारण म्हणजे विमा कंपनीनं गुरुवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले, ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत त्याचा निव्वळ नफ्यात वाढ झाली. आता अनेक ब्रोकरेज कंपन्याही या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत.
कंपनीचे तिमाही निकाल
कंपनीनं गुरुवारी सांगितले की, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून १०,९८७ कोटी रुपये झाला आहे. एलआयसीने एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत प्रीमियम उत्पन्नातून १.१९ लाख कोटी रुपये कमावले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी अधिक आहे. वैयक्तिक ग्राहक आणि ग्रुप पॉलिसी या दोन्हींमधून ही वाढ झाली आहे, ज्यावरून असे दिसून येते की बाजारात कडक स्पर्धा असूनही लोक एलआयसी विमा खरेदी करत आहेत.
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
एलआयसी आजही भारतातील आघाडीची विमा कंपनी आहे. आयआरडीएआयच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे देशातील पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या ६३.५१% हिस्सा आहे. वैयक्तिक विम्यात त्याचा बाजारातील वाटा ३८.७६ टक्के आहे, तर ग्रुप विम्यात तो ७६.५४ टक्के मार्केट शेअरसह अधिक मजबूत आहे.
ब्रोकरेजनं काय म्हटलं?
तिमाहीच्या उत्कृष्ट निकालानंतर मोतीलाल ओसवाल यांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी ब्रोकरेजनं १०८० रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलंय, जे शेअरच्या मागील बंद किमतीच्या तुलनेत २२% वाढ होण्याची शक्यता दर्शवते.
ब्रोकरेजनं म्हटलंय की एलआयसीचं अॅन्युअल प्रीमिअम इक्विव्हॅलंट (नवीन प्रीमियम विक्रीचे मोजमाप) आणि नवीन व्यवसायाचं मूल्य (नवीन पॉलिसींमधून नफा) अपेक्षेनुसार आहेत. त्याचं व्हीएनबी मार्जिन (नवीन पॉलिसींमधून नफ्याची टक्केवारी) १५.४% पर्यंत वाढलं, अधिक नॉन-क्रॉस उत्पादनांच्या विक्रीमुळे (प्रॉफिट-शेअरिंग नॉन-प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी) मदत झाली. एलआयसीच्या व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष २०२६ च्या उत्तरार्धात प्रीमियम वाढीला वेग येण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजनं असंही म्हटलंय की एलआयसीचे मुख्य धोरण नवीन व्यवसायातून एकूण नफा वाढवणं आहे.
ब्रोकरेज फर्म मॅक्वायरीचे एलआयसीवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग असून त्याची टार्गेट प्राइस १,२१५ रुपये निश्चित केली आहे. एलआयसीचं व्हीएनबी मार्जिन (नवीन पॉलिसींमधून नफ्याची टक्केवारी) सुधारलं आहे कारण त्याचा खर्च कमी झालाय. नवीन व्यवसायातून एलआयसीचा नफा येत्या काही वर्षांत फार वेगानं वाढण्याची शक्यता नाही.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)